It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

गुणवंत विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार करणारा प्रियकर आणि ब्लॅकमेलिंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध पोलिसात गुन्हा

Spread the love

आपल्याच शाळेतील दहावीतील  गुणवंत विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम प्रियकर आणि ब्लॅकमेल करणारा शिक्षक फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित तरुणी आमगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. दहावीत तिने ७६ टक्के मिळवून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले. याबद्दल शाळेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमगाव तालुक्यातील अमराईटोला बोरकन्हार येथील राहणारा प्रदीप (वय-२२) उपस्थित होता. पदक प्राप्त झाल्याने प्रदीपने पीडितेला शुभेच्छा दिल्या. नंतर दोघांमध्ये चांगली गट्टी जुळली. याचा फायदा घेत प्रदीपने २६ जानेवारी २०१९ पासून आतापर्यत अनेकदा शरीर संबंध प्रस्थापित केले. याबाबत शाळेतील एका शिक्षकाला समजले. त्याच्यातील शैतान जागा झाला. शिक्षकाने आपल्या मोबाईलवरून अल्पवयीन पीडित तरुणीला वारंवार फोन करून ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. ‘तू प्रदीपसोबत मौजमस्ती करते, मला माहीत आहे. तशीच मौजमस्ती माझ्यासोबतही कर’, असे तो तिला वारंवार म्हणत होता. शिक्षक पीडितेचा पाठलाग करून तिला शरीरसुखाची मागणी करत होता. अखेर या प्रकाराला कंटाळून पीडितेने १७ जुलैला आमगाव पोलीस स्टेशन गाठून आपबिती कथन केली. उपविभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पीडितेची वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी प्रदीप (रा. बोरकन्हार) आणि शिक्षक खुशाल (30, रा.भंडारा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.