Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Beed : अज्ञात वाहनाच्या धडकेने तीन शाळकरी विद्यार्थी जागीच ठार , गेवराई तालुक्यातील घटना

Spread the love

व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने उडवल्याची घटना गेवराई तालुक्यात तळेवाडी फाट्यावर घडली आहे. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे. कल्याण विशाखापट्टनम राष्ट्रीय महमार्गावर हा अपघात झाला. अपघातात मृत्यू पावलेले तिघेही तरुण गेवराईतील तळेवाडी येथील रहिवासी  आहेत. अभिषेक भगवान जाधव (वय १४), सुनील प्रकाश थोटे (वय १४), तुकाराम विठ्ठल यमगर (वय १६) अशी त्यांची नावं आहेत.

अपघाती मृत्यू झालेल्या तिघांनाही सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. पण त्यांच्यावर काळाने घाला घातला. जय भवानी हायस्कूल गढी येथे शिक्षण घेत होती. घटनेची माहिती समजताच तळेवाडी गावावर शोककळा पसरली असून गावात एकही चूल पेटली नाही.

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिघेही पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान कल्याण – विशाखापट्टणम या महामार्गावर व्यायाम करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान गढीकडून माजलगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने तिघांनाही पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गावातील काही तरुण सैन्यात भरती आहेत. ते सुट्ट्यात गावी आले असता तिघेही त्यांना आम्हाला सैन्यात भरती व्हायचे आहे, देशसेवा करयाची आहे असे म्हणत, असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

इतर बातम्या …

वाराणसी लोकसभा निवडणूक: पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी अलाहाबाद हायकोर्टाने जारी केली नोटीस; बीएसएफचा माजी जवान तेज बहादूर यांनी दाखल केली आहे याचिका

सोनभद्रला जाणाऱ्या तृणमूलच्या खासदारांना वाराणसी विमानतळावरच रोखले; धरणे आंदोलन सुरू

पालघरमध्ये सकाळी 9.17 वाजता 3.5 रिश्टर स्केल एवढ्या भूकंपाचे धक्के जाणवले

अकोला : बोरगाव मंजू ठाण्याअंतर्गत कानशिवणी येथे मुलाने केली वडिलांची हत्या.

पुणेः माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची फेसबूक लाईव्ह करत अजित पवार यांच्यावर टीका.

गेवराई तालुक्यातील 3 शालेय विद्यार्थी जागीच ठार; अभिषेक भगवान जाधव, तुकाराम विठ्ठल यमगर, सुनील प्रकाश थोटे मृतांची नावे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!