Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सावधान : हॅकर्सही झाले स्मार्ट , लोकांच्या बेडरूममध्येही करू शकतात प्रवेश !! पॉर्न साईट पाहणारेही अनसेफ !!

Spread the love

स्मार्ट उपकरणे आणि डिजिटल युगात देशात सध्या कोणीही सुरक्षित नाही, हेच खरे आहे.  तुम्ही वापरत असलेल्या डिव्हाईसेसद्वारे कोणी ना कोणी तुमच्यावर सातत्याने लक्ष ठेवत असते. सुरतमध्ये स्मार्ट टीव्ही हॅक झाल्याच्या दोन घटना घडल्या होत्या, त्यामुळे सध्या हाच मुद्दा चर्चेत आहे. आपल्या ‘त्या’ क्षणांचा व्हिडिओ इन्टरनेटवर पाहिल्यावर त्या जोडप्याची झोपच उडाली. कोणत्याही सिस्टमविना हॅकर्सनी हे कृत्य केले आहे, त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

डिजिटल युगामध्ये जवळजवळ प्रत्येकजण स्मार्ट उपकरणांचा  वापर करत आहे. त्यामुळे सायबर क्राईमच्या  घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी फक्त पैशांपर्यंत मर्यादित असणारे हे गुन्हे आता तुमच्या बेडरूमपर्यंत पोहोचले आहेत. फोन किंवा संगणक हॅक  करणे हा प्रकार सर्रास घडतो. मात्र गुजरातमध्ये चक्क स्मार्ट टीव्ही हॅक करण्यात आला आहे. टीव्ही हॅक करून पती पत्नीमधील नाजूक क्षणांचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यात आला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, खासदार अमर साबळे यांनी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला होता, त्यानंतर तो आता जास्तच चर्चेत आला आहे.

काय म्हणाले अमर साबळे ?

“देशातील सर्व दांपत्याच्या खासगी क्षणांच्या सुरक्षेकडे मी लक्ष वेधू इच्छितो. तंत्रज्ञानामुळे सुरक्षेला धोका असून सायबर सुरक्षेची गरज आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि इंटरनेटमध्ये दिवसेंदिवस नवीन शोध लागत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा फायदा आहे तसा धोकाही आहे. बेडरुरममध्ये स्मार्ट टीव्ही असणं धोकादायक आहे. हॅकर्स आता आपल्या बेडरुममध्ये पोहोचले आहेत. सुरतमध्ये अशी दोन प्रकरणं समोर आली आहेत. त्यांनी स्मार्ट टीव्ही हॅक करुन पती-पत्नीचा व्हिडीओ बनवला. दांपत्याने व्हिडीओ पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हॅकर्सनी कोणत्याही सिस्टमविना हे केलं आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून कारवाई केली पाहिजे”.

तुम्ही पॉर्न साईट पाहताय आणि ते तुम्हाला पाहताहेत !!

माहिती अशीही आहे कि , तुम्ही पाहात असलेल्या ऑनलाईन पॉर्न व्हडिओ , चित्रपटांवर गूगल  आणि फेसबूक बारीक लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे ऑनलाईन पॉर्न पाहणाऱ्या युजर्सचा ते डेटा तयार करतात. हा डेटा ते केवळ तयारच करत नाहीत तर तो त्या इतर टेक कंपन्यासोबत शेअरही करतात. यूजर्सची ऑनलाईन अॅक्टीविटी ट्रॅक करण्यासाठी असे केले जाते. इतकेच नव्हे तर, तुम्ही तुमच्या कॉम्प्यूटरवर Incognito मोडवर पॉर्न पाहात असला तरीही ते ट्रॅक केले जाते.

गूगल आणि फेसबूकही करतंय युजर्सला ट्रॅक

दरम्यान, ९३ टक्के संकेतस्थळांपैकी ७४ टक्के पॉर्न बेबसाईट (संकेतस्थळ) अशा होत्या ज्या गूगल आणि त्यांच्या इतर कंपन्याच ट्रॅक करत होत्या. सॉप्टवेअर डेव्हलपर कंपनी ऑरकल हीसुद्धा सुारे २४ टक्के पॉर्न साईट्सना ट्रॅक करताना अभ्यासकांना आढळून आले. इतकेच नव्हे तर लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सोशल नेटवर्कींग मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक हे सुद्धा प्रति १० युजर्समागे एक युजर्सचे पॉर्न साइट ट्रॅकींग करत असल्याचे रिसर्चर्सना आढळून आले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!