Aurangabad Crime : मोबाईल टाॅवरच्या बॅटर्‍या चोरणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील दोघे मुद्देमालासह अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मोबाईल टाॅवरच्या १ लाख ८१ हजाराच्या बॅटर्‍या चोरणार्‍या टोळीतील दोन आंतरराज्यीय दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी बेड्या ठोकल्या.
रिजवान शहानाजुद्दीन शेख(२६) , जलाल्लूद्दीन बीरबल (२२) दोघेही राहणार कमरुद्दीन नगर जि.मेरठ उत्तर प्रदेश अशी अटक आरोपींची नावे आहेत. या चोरट्यांनी पैठण, बिडकीन, औरंगाबाद , जालना, बीड, अहमदनगर, जळगाव या ठिकाणाहून बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ५३ बॅटर्‍या जप्त केल्या आहेत. वरील दरोडेखोर बॅटर्‍या चोरल्यानंतर साजापूरच्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट मार्फत दिल्ली व उत्तर प्रदेशात पाठवंत होते. असे पोलिसांच्या तपासात उघंड झाले आहे.
वरील कारवाई पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय भगतसिंग दुलत,पोलिस कर्मचारी सय्यद जियाभाई, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे यांनी पार पाडली.

Advertisements

आपलं सरकार