Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : ” जय श्रीराम ” प्रकरणी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, खा . इम्तियाज जलील आणि अतुल सावे यांचे शहरवासीयांना आवाहन

Spread the love

औरंगाबाद शहरात काही समाजकंटकांनी एक मुस्लिम युवक कामावरून घरी परत येत असताना त्याला रस्त्यात थांबवून ” जय श्रीराम ” म्हणण्यास भाग पडल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल होताच त्याचे शहरात तीव्र पडसाद उमटले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी तत्काळ व्हिडीओ  जारी करून  शहरवासियांना शांततेचे आवाहन केले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे .

खासदार इम्तियाज जलील यांचेही शांततेचे आवाहन

या प्रकरणी महानायक ऑनलाईनशी बोलताना खा . इम्तियाज जलील म्हणाले कि , दोन समाजात तेढ निर्माण व्हावी म्हणून काही लोक मुद्दाम प्रयत्न करीत आहेत. हे लोक संख्येने कमी असून त्यांचा हेतू लक्षात घ्यावा . पोलिसांना आपले काम करू द्यावे. आमचा न्याय व्यवस्थेवर आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास असून कोणीही समाज कंटकांच्या कुठल्याही कृत्याला बळी  न पडता शहरात शांतता ठेवावी .

राज्यमंत्री अतुल सावे यांचेही आवाहन

या पूर्वी शहरात असा प्रकार कधीही घडला नसून आपण पोलिसांकडून माहिती घेत आहोत. या प्रकरणात सत्य काय आहे हे पोलीस शोधून काढतील . नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंत्री अतुल सावे यांनीही महानायक ऑनलाईनशी बोलताना सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!