Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

31 July : दंड टाळायचा असेल तर IT रिटर्न भरणे अनिवार्य , जाणून घ्या कसा असेल दंड ?

Spread the love

३१ जुलै ही रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. समजा तुम्ही ३१ जुलैच्या आत IT रिटर्न भरू शकला नाहीत तर तुमच्याकडे अजून एक संधी असते. त्या अवधीत तुम्ही रिटर्न भरून दंडापासून वाचू शकता.

फिस्कल इयर २०१८-१९ साठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे ३१ मार्च २०२०. तुम्ही या तारखेपर्यंत रिटर्न फाइल करू शकला नाहीत तर मात्र तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटिस मिळू शकते. जरी तुम्ही ३१ मार्च २०२० पर्यंत रिटर्न फाइल करू शकत असलात तरी तो जुलैमध्येच करावा. तुम्ही ३१ जुलै २०१९ नंतर आणि ३१ मार्च२०२० च्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न भरलात तर तुम्हाला दंड बसू शकतो. तुम्ही ३१ जुलैनंतर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत IT फाइल केलात तर तुम्हाला ५ हजार रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही १ जानेवारी २०२० पासून ३०  मार्च २०२० पर्यंत रिटर्न भरलात तर तुम्हाला १०  हजार रुपये दंड भरावा लागेल.

इन्कम टॅक्स सेक्शन 234F चा समावेश झाल्यावर लेट फाइन अनिवार्य झालीय. याआधी हे सर्व असेसिंग अधिकाऱ्यांवर अवलंबून असायचं. ते दंड लावतात की नाही ते. ज्यांची मिळकत ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ते ३१ मार्च २०२० च्या आधी रिटर्न फाइल करत असतील तर जास्तीत जास्त लेट फी १००० रुपये लागेल. एखाद्या करदात्याची पूर्ण मिळकत टॅक्स स्लॅब सवलतीमध्ये येत असेल आणि त्यानं उशिरा रिटर्न भरले तर त्याला कुठलाही कर लागत नाही. समजा एखाद्याला परदेशातल्या संपत्तीतून मिळकत होत असेल आणि ती व्यक्ती कर सवलतीच्या सीमेत असेल तरीही रिटर्न फाइल केल्यावर कर लागू शकतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!