Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेस तर शरीरावर धड नसलेला पक्ष , ४० जागांचा प्रस्ताव त्यांना मान्य असेल तर आमची युती होईल : प्रकाश आंबेडकर

Spread the love

‘सध्या काँग्रेसकडे फक्त धड राहिले असून, डोके वरपासून खालपर्यंत राहिलेले नाही’, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत वंचितने आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आम्ही काँग्रेसला ४० जागांची ऑफर केली असून, त्यांनी ती स्वीकारावी, आम्ही तयार आहोत’, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसला कुठल्या आधारावर आपण ४० जागा ऑफर करत आहात , असे विचारले असता ते म्हणाले कि , त्यांची जेवढी स्ट्रेंथ आहे तितक्याच जागा आम्ही त्यांना देत आहोत .

मागच्या वेळी जेवढे आमदार निवडून आले होते तेवढ्या जागा आपण त्यांना देणार का ? असे विचारले असता , ते म्हणाले त्यांच्या किती जागा निवडून आल्या होत्या मला माहित नाही. ‘काँग्रेसकडे त्यांचे संघटन मजबूत राहिले नसल्याची देखील टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या जगाचे काय ? असे विचारले असता ते म्हणाले कि , राष्ट्रवादीला आमचे मतदान झाले पण राष्ट्रवादीचे मतदान आम्हाला झाले नाही असे काँग्रेसचेच म्हणणे होते त्यामुळे मला काही सांगता येणार नाही.

काँग्रेस , राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येत आहेत याबद्दल विचारले असता ते म्हणाले मला माहित नाही. एमआयएमची 100 जागांची मागणी आमच्याकडे पोहोचली नाही, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. माझी असदुद्दीन ओवेसींसोबत बैठक झाली. आमची आघाडी पुढे कायम ठेवण्याचं आमचं ठरलं आहे,  जागा वाटपाबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही . निवडून येतील अशा जागा लढविण्याविषयीची एम आय एम ची भूमिका असल्याचे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

कर्नाटकमधील चालू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाचे कर्नाटकात चालू असलेले फोडाफोडीचे राजकारण नवीन नसून, काँग्रेसने देखील असेच राजकारण याआधी केले असल्याची टिप्पणी केली. ‘भाजपा फार हळू चालले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अगोदर काँग्रेसचे राज्य असलेले तिनही सरकार पडणार’, असल्याचे ते म्हणाले.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी त्यांनी निवडणुका या ईव्हीएमवर न घेता बेलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करत लोकसभेच्या ४८ जागांपैकी अनेक ठिकाणी जास्त आणि काही ठिकाणी कमी मते मिळाल्याचे मतमोजणीनंतर समोर आले असल्याचा दावा केला. त्यासाठी आम्ही ३१ याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीनमध्ये हॅकिंगही नाही आणि त्यात फेरफारही करता येत नाही असे स्पष्टपणे जाहीर केले आहे. मात्र, विनिबिलिटी हा फॉर्म्युला आम्ही ठरवला आहे. ज्या जागा जिंकता येतील त्यावर उमेदवार देण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे हे का झाले? याची माहिती न्यायालयाने आयोगाकडून घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

तुम्हाला भाजपकडून राज्यसभेची ऑफर आली आहे का ? यावर ते म्हणाले त्यात काहीही तथ्य नाही . मला सत्ता नसली तरी काही फरक पडत नाही. मी खासदारांकडे कधीही जात नाही , खासदार माझ्याकडे येतात. इतकी वर्षे मी सत्तेत नाही पण त्याने काहीही बिघडत नाही.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!