Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : “त्या ” इमारतीत १२ जणांचा मृत्यू , ४० जण अडकल्याची भीती

Spread the love

मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे ४० जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. दोन लहान मुलांना आणि एका स्त्रीला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.  ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असताना पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. चिंचोळी गल्ली असल्याने या ठिकाणी मदतकार्यात अडथळे येत आहेत.

जखमींची नावं
फिरोज नाझिर सलमान
आएशा शेख
सलमा अब्दुल सत्तार शेख
अब्दुल रहमान
नावेद सलमानी
इम्रान हुसैन कालवानिया
एक अनोळखी माणूस

मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं असून मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० लोक अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. मदत व बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

कौसरबाग इमारत १०० वर्षे जुनी होती. म्हाडाच्या अखत्यारीत येणारी ही इमारत पुनर्विकासासाठी विकासकाला दिली होती. मात्र, या विकासकाने पुर्नविकासाचे काम वेळात सुरू केले होते की नाही, याची चौकशी केली जाईल. तसेच, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या इमारतीत १५ कुटुंब राहत असल्याची माहिती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी या दुर्घटनेचा सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “डोंगरी भागातील दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पुनर्विकास यादीत होती मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात इमारत पुनर्विकासाबाबतची एक बैठकही घेतली नाही. पुनर्विकासाच्या इमारतींबाबत सरकारचे धोरण हे उदासीन आहे. पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या? राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच अशा इमारत दुर्घटना होत आहेत. राज्य सरकारचे पुनर्विकासाचे उदासीन धोरण, म्हाडा आणि मुंबई  महापालिका दुर्घटनेला जबाबदार आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!