Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : वादळी चर्चेनंतर अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणा (सुधारणा) विधेयक २०१९ मंजूर

Spread the love

लोकसभेत वादळी चर्चेनंतर सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (सुधारणा) विधेयक २०१९ मंजूर झाले. या विधेयकामुळे आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला एखाद्या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी परदेशातही तपास करण्याचे अधिकार मिळाले आहेत. सभागृहात या विधेयकासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, ‘आज देश तसेच जगासमोर दहशतवादाचे संकट आहे. अशा वेळी एनआयए सुधारणा विधेयकाचं उद्दिष्ट तपास संस्थेला राष्ट्रहितासाठी बळकट बनवणं हा आहे.’

दरम्यान, याच विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांच्यात लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ‘या कायद्याचा उपयोग दहशतवाद नष्ट करण्यासाठी केला जाईल, मात्र कोणत्या धर्माच्या व्यक्तीने गुन्हा केलाय हे पाहिलं जाणार नाही.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!