Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC WC 2019 Final ENG vs NZ : सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक चौकाराच्या नियमाने इंग्लंड ठरला सुपर हिरो !!

Spread the love

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात सुपर ओव्हर च्या खेळीवर इंग्लंडचा संघ अखेर विश्वविजेता ठरला . सुपर ओव्हरमध्येही इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोघांनीही प्रत्येकी १५ धावा केल्या. पण तरीही इंग्लंडला विश्वविजयी  घोषित करण्यात आले. कारण नियम असे सांगतो कि , सुपर ओव्हरमध्ये जर टाय झाली तर दोन्ही संघांपैकी कोणी जास्त चौकार लगावले हे पाहिले जाते. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दोन चौकार लगावले, तर न्यूझीलंडला एकही चौकार लगावता आला नाही. त्यामुळे इंग्लंडला सुपर ओव्हरमध्ये जास्त चौकार लगावल्यामुळे विश्वविजेता घोषित करण्यात आले.

इंग्लंडच्या विश्वविजयाचा शिल्पकार ठरला तो अष्टपैलू बेन स्टोक्स. कारण स्टोक्सने अखेरपर्यंत किल्ला लढवत ८४ धावांची अतुलनीय खेळी साकारली. त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्येही त्याने दमदार फलंदाजी केली. त्यामुळेच स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्टोक्सला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला आणि त्याचे कौतुकही केले.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे. तर न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि गोलंदाज जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. बेन स्टोक्सने नाबाद ८४ धावा केल्या. तर सुपर ओव्हरमध्येही स्टोक्सने दमदार फलंदाजी केली. जोफ्रा आर्चरने सुपर ओव्हरमध्ये केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला विजय साजरा करता आला. बेन स्टोक्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!