Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनोरंजन : ” सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का” करोडो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या “सोनू” ची गोष्ट !!

Spread the love

चित्रपट सृष्टी बद्दल प्रत्येकालाच विलक्षण आकर्षण असते ,पुणे जिल्ह्यातील पानशेत रस्त्यावर निसर्गाचे वरदान लाभलेले सोनापूर नावाचे छोटेसे गाव आहे याच गावात जन्म झालेला मारूती चव्हाण हया तरूणाला हि चित्रपटाचे विलक्षण आकर्षण होते . घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने त्याला शिक्षण फक्त बारावी पर्यंतच घेता आले . परिस्थिती अत्यंत बिकट होती तरी हार न मानता त्याने आपल्या सोनेरी स्वप्नांच्या दिशेनी आगेकूच सुरू केली. आलेल्या अनेक अडचणींवर मात करीत आपल्या स्वप्नांचा ध्यास अविरतपणे सुरू ठेवला आणि ” सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का” हे गीत चिञीकरण करण्याचे ठरवले. चिञीकरणास खूप खर्च लागणार होता. तो जमवत असताना त्याने बरीच तारेवरची कसरत केली मारूतीने आपल्या जवळचे सोने मोडले.

पेशाने किरकोळ आडतदार असलेला मारूती पुणे येथील छञपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड येथे दररोज मध्यरात्री भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. अनेकांनी तू काळासावळा आहे तुला रसिक स्वीकारणार नाही, असे हि अनेकदा हिणवले पण मारूतीने लोकांच्या टीकेकडे दूर्लक्ष केले आणि चिञीकरणात आपली एॅट्री हॅलीकॅपरटरने झाली पाहिजे ही त्याची संकल्पना दृढ होती व त्यांने ती “सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय “ह्या गाण्यात वास्तवातही  साकारली अत्याधुनिक तंञीक गोष्टीचा वापर करून गाण्याचे चिञीकरण यशस्वी रित्या पूर्ण केले. मराठी चित्रपट सृष्टीचा नायक हि हॅलीकॅपरटरने एॅट्री करू शकतो हे पहिल्यांदा मारूतीने दाखवून दिले ,चिञीकरणान॓तर गाण्याचे प्रसारण झाले व अल्प कालावधीत दूरचिञवाणीवर हे गाणे लोकप्रिय हि झाले आजपर्यंत यु ट्यूब वर जवळपास 6 करोड हून अधिक रसिकांच्या पसंतीस हे गाणे उतरले आहे,सामान्य कुटुंबातील मारूतीचा हा यशोदायी प्रवास तरूणांसाठी प्रेरणादायी आहे आज अभिनेता म्हणून मारुती चव्हाण हा करोडो तरूणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!