Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांच्यात शाब्दिक विवाद

Spread the love

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांच्यात लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. लोकसभेत एनआयए सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना ही खडाजंगी झाली.  एनआयए सुधारणा विधेयकावर भाजप खासदार सत्यपाल सिंह भाषण करत होते. त्यावेळी सत्यपाल सिंह यांनी हैदराबादमधील एका नेत्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला एका आरोपीविरोधात कारवाई करण्यापासून रोखले होते. ही कारवाई झाली असती तर त्या नेत्यासाठी अडचणीचे ठरले असते, असे म्हटले.

या वक्तव्यावर असुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेत ज्या व्यक्तीबद्दल चर्चा करण्यात येत आहे, ज्यांच्या खासगी संभाषणाबद्दल चर्चा सुरू आहे. त्या व्यक्ती सभागृहात नाही. भाजप सदस्य त्याबाबतचे पुरावे लोकसभेवर पटलावर मांडू शकतील का, असा सवाल केला. त्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी ओवेसी यांनी भाजप सदस्य बोलताना अडथळा आणू नये असे म्हटले. डीएमके खासदार ए. राजा बोलत असताना ओवेसी यांनी त्यांना अटकाव केला नाही. त्यामुळे सदस्यांना वेगवेगळा न्याय देता कामा नये असेही शहा यांनी ठणकावले. दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विरोधी सदस्यांनी संयम बाळगला पाहिजे असे ओवेसींना सुनावले.

यावर ओवेसी यांनी गृहमंत्री आहात तर, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका असे शहा यांना उद्देश्यून म्हटले. त्यावर शहा यांनी ज्यांच्या मनात भिती आहे, त्यांना भिती वाटणारच. त्याला आम्ही तरी काय करणार असे म्हणत पलटवार केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!