Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , तांत्रिक कारणांमुळे  चंद्रयान 2  च्या मोहिमेला तूर्त स्थगिती , नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल …

Spread the love

तांत्रिक कारणांमुळे  चंद्रयान 2  च्या मोहिमेला थांबविण्यात आल्याचे वृत्त दूरदर्शनने दिले आहे . : २.२० पहाटे

या वृत्तात म्हटले आहे कि , आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून  तांत्रिक कारणास्तव आता नियोजित वेळेत चांद्रयान 2 हे उड्डाण करणार नाही. इस्रो पत्रकार परिषद घेऊन लवकरच या संदर्भातली माहिती देणार आहे. भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपास्त्राच्या साह्याने हे यान चंद्रावर पाठविण्यात येणार होते. परंतु त्यापूर्वीच इस्रोनं ही मोहीम तात्पुरती रद्द केली आहे.

श्रीहरिकोटा: इस्त्रोच्या महत्वकांक्षी चांद्रयान -२ मोहिमेची तयारी पूर्ण . रॉकेटमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात.

वर्ल्डकप: इंग्लंड ठरला नवा क्रिकेट विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर एका धावेने मात

जम्मू-काश्मीरला रात्री 9.56 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

अहमदनगर: अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर धावत्या कारला आग

राज्यात आगामी मुख्यमंत्री आघाडी सरकारचा असेल : बाळासाहेब थोरात

मुंबई: मालाड येथील अक्सा बीचवर एका तरुणाचा बुडून मृत्यू

10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता : गिरीश महाजन

मुंबई: बोरिवलीतील दौलतनगरजवळील नदीत एका ४३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला

धुळे : सोशल मीडियावर देवी, देवतांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेतर्फे सोमवारी धुळे बंद

मुंबई – घाटकोपर येथे अज्ञाताने केलेल्या चाकू हल्ल्यात 20 वर्षीय तरुणी ठार, पोलिसात गुन्हा दाखल

अहमदाबाद – येथील कनकरिया परिसरातील एका अॅडव्हेंचर पार्कमधील झोक्याचा अपघात झाला आहे. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 26 जण जमखी आहेत.

ठाणे – कोपरी येथील मीठानगर क्रीक येथे दोन मृतदेह आढळून आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस घटनास्थळी दाखल

नवी दिल्लीः भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी होणार.

छत्तीसगड : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 2 नक्षली ठार, एकाला अटक.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!