ICC WC 2019 Final ENG vs NZ Live : इंग्लंडचा ‘सुपर’ विजय ! क्रिकेटला मिळाला नवा विश्वविजेता, रोमांचक – रंगतदार सामना

Advertisements
Advertisements
Spread the love

अतिशय रोचक आणि रंगतदार विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

सुपर ओव्हर : न्यूझीलंड १५ धावा, इंग्लंड नवा विश्वविजेता

गोलंदाज – जोफ्रा आर्चर

बॉल ० – व्हाईड

बॉल १ – २ धावा (नीशम)

बॉल २ – षटकार (नीशम)

बॉल ३ – २ धावा (नीशम)बॉल ४ – २ धावा (नीशम)

बॉल ५ – १ धाव (नीशम)

बॉल ६ – १ धाव आणि धावचीत (गप्टील)

New Zealand Vs इंग्लंड धावफलक

सुपर ओव्हर : इंग्लंड – १५ धावा, न्यूझीलंडला विजयासाठी १६ धावांची गरज

गोलंदाज – ट्रेंट बोल्ट

बॉल १ – ३ धावा (स्टोक्स)

बॉल २ – १ धाव (बटलर)

बॉल ३ – चौकार (स्टोक्स)

बॉल ४ –  १ धाव (स्टोक्स)

बॉल ५ – २ धावा (बटलर)

बॉल ६ – चौकार (बटलर)

सामना सुपर ओव्हरमध्ये

विश्वचषक स्पर्धा २०१९ चा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये गेलेला आहे. न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील शेवटच्या चेंडूवर १ धाव काढत २४१ धावा करण्यात यश मिळवले. त्यामुळे आता सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये होणार आहे.

ENG need 1 runs in 0 balls to win

Advertisements

MATCH TIED, SUPER OVER TO DECIDE THE WINNER!

Advertisements
Advertisements

इंग्लंड                   :          241/9 (50)

Super Over                 15/0

B. Stokes : 84/98

J. Roy : 17/20

New Zealand :          241/8 (50.00)

Super Over                 15/1

A. Rashid : (Out) 0/0

J. Archer : (Out) 0/1

L.Pulnkett : (Out) 10/9

C.Wokes : (Out) 2/3

J. Buttler : (out) 57/57

E. Morgan: (out)  9/22

जॉनी बेअरस्ट्रो : (out) 36 / 55

जो रूट  :     (out)        7/30

जेसन रॉय बाद; इंग्लंडला पहिला धक्का

उपांत्य फेरीत दमदार खेळी करणारा जेसन रॉय अंतिम सामन्यात २० चेंडूत १७ धावा करून माघारी परतला. त्याने ३ चौकार लगावले, पण मॅट हेन्रीने त्याला झेलबाद केले.

वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडकडून सलामीवीर हेन्री निकोल्सने अर्धशतकी खेळी साकारली. तर टॉम लॅथमने ४७ धावांचं योगदान दिलं. कर्णधार केन विल्यसनने ३० धावा केल्या. इंग्लंडकडून अॅडम प्लंकेटने किवींच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. सामन्याची नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्विकारली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी किवींवर वर्चस्व राखत फलंदाजांना वेसण घातली. ख्रिस वोक्सने मार्टिन गप्टिलला(१९) पायचीत करत इंग्लंडला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने सावध खेळ करत मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडचा डाव सावरत असतानाच प्लंकेटने विल्यमसनला(३०) माघारी धाडलं आणि इंग्लंडला पुन्हा एकदा सामन्यात वर्चस्व प्राप्त करून दिलं. निकोल्सने एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण केलं. पण प्लंकेटने पुन्हा एकदा इंग्लंडला मोठं यश मिळवून दिलं. प्लंकेटने निकोल्सला ५५ धावांवर क्लीनबोल्ड केलं.

रॉस टेलर देखील यावेळी चांगली कामगिरी करू शकला नाही. मार्क वूडने टेलरला(१५) पायचीत केलं. जिमी निशमने मैदानात येताच जोरदार फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या धावफलकाला गती प्राप्त करून दिली. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात निशम(१९) जो रुट करवी झेलबाद झाला. अखेरच्या १० षटकांमध्ये टॉम लॅथमने दमदार फलंदाजी करत संघाला दोनशेचा आकडा गाठून दिला.

आपलं सरकार