Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दोन दिवस शोधूनही दिव्यांशचा शोध लागला नाही , शोधकार्य थांबवले

Spread the love

गोरेगाव येथे उघड्या गटारात पडलेल्या दिव्यांश सिंग या दोन वर्षाच्या मुलाचा दोन दिवसांनंतरही शोध लागलेला नाही. पोलीस, पालिका, अग्निशमन दल, एनडीआरएफच्या पथकांची शोधमोहीम बुधवारी रात्रीपासून सुरू होती. मात्र आता महापालिकेने शोध थांबवला आहे. आज दिव्यांशच्या शोधासाठी ड्रोनचा वापरही करण्यात आला. मात्र त्याचा काहीही माग लागला नाही.

दोन दिवस शोध करूनही दिव्यांश सापडत नसल्याने पालिकेने शोध थांबवला असल्याच्या वृत्ताला पालिकेचे अधिकारी आणि गोरेगावातील शिवसेना नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांनीही दुजोरा दिला. दिव्यांश सापडत नसल्याने स्थानिक नागरिक वारंवार आंदोलनाचा इशारा देत असल्याने शुक्रवारी या ठिकाणी तणावाची स्थिती होती. त्यामुळे पोलिसांनी या आंबेडकरनगर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकातील चाळीत राहणारा दिव्यांश बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रस्त्याकडेला असलेल्या गटारात पडला. जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिक, पोलिस, पालिका, अग्निशमन दल, एनडीआरएफच्या पथकांनी शोधमोहीम हाती घेतली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी या घटनेचा येथील नागरिकांनी रस्ता रोको करून निषेध केला. गुरुवारी दिवस-रात्र शोध घेऊनही दिव्यांशचा काहीच पत्ता न लागल्याने शुक्रवारीही शोधमोहीम कायम ठेवण्यात आली. मात्र नंतर अग्निशमन दलाने शोधकार्य थांबवले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!