पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बस-कंटेनर अपघात , ३२ प्रवासी जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

कोल्हापूर जवळ आज एक धक्कादायक अपघात झाला. ST महामंडळाच्या बसने रस्त्यात उभ्या असलेल्या एका मोठ्या कंटेनरला धडक दिली. या धडकेत ३२ प्रवासी जखमी झालेत. उपचारासाठी त्यांना CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यात पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव इथं हा अपघात घडला.

Advertisements

आजरा-कोल्हापूर ही एसटी बस सकाळी सव्वादहाच्या सुमारास आजरा येथून बाहेर पडली त्यांनतर दुपारी 2 वाजता गोकुळ शिरगाव येथे ही बस आली, त्यावेळी बस ड्रायव्हरने बसच्या समोर अचानक आलेल्या मोटर सायकलला वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बसचं स्टेअरिंग अचानक जाम झालं. त्यामुळे बस रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात बसमधले 32 प्रवासी जखमी झालेत.

Advertisements
Advertisements

या सर्व प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलंय. या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

आपलं सरकार