Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वामन हरी पेठे ज्वेलर्स फसवणूक प्रकरण : मुथ्थुट फायनान्स-आयआयएफएल फायनान्स मधुन अर्धा किलो सोने जप्त

Spread the love

राजेंद्र जैन याने दुस-याच्या नावाने सोने गहाण ठेवल्याचा संशय

नामांकित वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ५८ किलो सोन्याचे हिरेजडित दागिने लांबविणा-या राजेंद्र जैन याने मुथ्थुट फायनान्स व आयआयएफएल फायनान्स येथे गहाण ठेवलेले अर्धा किलो सोने मंगळवारी (दि.९) जप्त केले. राजेंद्र जैन याने आपली पत्नी व वाहनचालकांच्या नावाने सोने गहाण ठेवले असल्याचा पोलिसांचा संशय असून पोलिस त्या दिशेने तपास करीत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, राजेंद्र जैन याच्याकडून सोने खरेदी करणा-या राजेश उर्फ राजू सेठीया (वय ५०, रा.उस्मानपुरा) याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
समर्थनगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्समधून व्यवस्थापक अंकुर राणे व कपडा व्यापारी राजेंद्र किसनलाल जैन यांनी कट रचून ५८ किलो सोने लांबवल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला. सोन्याचा हा आकडा ६५ किलोपर्यंत जाण्याची शक्यता असताना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी वर्तविला आहे. राजेंद्र जैन याने वामन हरी पेठे ज्वेलर्समधुन लांबविलेल्या सोन्यापैकी २१ किलो सोने मणप्पुरम फायनान्स येथे ठेवून ४ कोटी ४३ लाख ४८ हजार ९८७ रूपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झाल्यावर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मणप्पुरम फायनान्स येथून २१ किलो सोने जप्त केले होते.
दरम्यान, राजेंद्र जैन याने सराफा बाजारातील सोने चांदीचे व्यापारी जडगांवकर ज्वेलर्सचे राजेश उर्फ  राजू सेठीया यांना विक्री केली असल्याची कबूली दिल्यावर, पोलिसांनी सोमवारी सायंकाळी राजू सेठीया यांना अटक केली. अटकेत असलेल्या राजू सेठीया यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सेठीया यांना १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मुत्थुट फायनान्स आणि आयआयएफएलची दिवसभर झडती
राजेंद्र जैन याने निराला बाजार परिसरातील मुत्थुट फायनान्स आणि आयआयएलएफ फायनान्स येथे सोने गहाण ठेवून कर्ज घेतली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला दिली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी दिवसभर मुत्थुट फायनान्स व आयआयएफएल फायनान्सची दिवसभर झडती घेतली. या झडतीत आयआयएफएल फायनान्स येथून पोलिसांनी ३६० ग्रॅम आणि मुत्थुट फायनान्स येथुन २२० ग्रॅम असे एवूâण ५८ तोळे सोने जप्त केले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली आहे.

महिला पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की

मध्यवर्ती जकात नाका येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर कारवाई करणा-या महिला पोलिस उपनिरीक्षकास विखार खान निसार खान (वय १९, रा.रहेमानिया कॉलनी) याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना ८ जुलै रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडली. विखार खान याने उपनिरीक्षक सरला गाडेकर यांची आपल्या मोबाईलमध्ये व्हीडीओ शुटींग केली होती. तसेच त्यांच्या हातातील ई-चालान मशिन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सरला गाडेकर (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विखार खान याच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गिते करीत आहेत.

वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, विविध भागातून सहा दुचाकीसह चोरट्यांनी टिप्पर लांबविला

वाहन चोरट्यांनी औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा आपले डोके वर काढले असून चोरट्यांनी विविध भागातून सहा दुचाकीसह एक टिप्पर लंपास केला आहे. वाढत्या वाहन चोNया रोखण्यात गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांना अपयश आले आहे. वाहन चो-या वाढल्यामुळे वाहनधारकांत एकच खळबळ उडाली असून शहरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी सर्वसामान्य नागरीकातून करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शफीक शेख गुलाब (वय ४१, रा. संजयनगर, बायजीपुरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीडब्ल्यू-४४६८) चोरट्याने २३ जूनच्या रात्री बायजीपुरा भागातून चोरुन नेली.

सचिन कृष्णराव जोशी (वय ३९, धावणी मोहल्ला) यांची बुलेट क्रमांक (एमएच-२०-डीक्स-९४९४) चोरट्याने ७ ते ८ जुलैच्या मध्यरात्री घराजवळून चोरुन नेली. आशिष गोविंद शास्त्री (वय ३१, रा.पवननगर, हडको) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीके-८७१५) चोरट्याने ६ ते ७ जुलैच्या मध्यरात्री घराजवळून चोरून नेली. दिनकर नामदेवराव लोखंडे (वय ४५, रा.द्वारका नगर, हडको) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीजी-३९८७) चोरट्याने ६ ते ७ जुलैचया रात्री द्वारकानगर येथून चोरून नेली.

मुकींद विठ्ठल दाभाडे (वय ५७, रा.इंदीरानगर, गारखेडा परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीके-०९३४) चोरट्याने ८ जुलै रोजी पिरबाजार, उस्मानपुरा येथून चोरून नेली. नंदकिशोर बाबुराव वाघ (वय २७, रा.जयभवानी नगर, मुवुंâदवाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईसी-३१६३) चोरट्याने ३ ते ४ जुलैच्या रात्री जयभवानीनगर येथून चोरून नेली. राजू ताराचंद दौलतपुरे (वय ५०, रा.जवाहर कॉलनी, त्रिमुर्ती चौक) यांचा टिप्पर क्रमांक (एमएच-२०-एटी-१०७७) चोरट्याने ३ ते ४ जुलैच्या रात्री सातारा परिसरातील जबिंदा लॉन्स मैदानाजवळून चोरून नेला.
विविध भागातून वाहने लंपास करणा-या चोरट्याविरूध्द अनुक्रमे जिन्सी, सिटीचौक, सिडको, उस्मानपुरा, मुंकुंदवाडी आणि सातारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!