Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कर्नाटक मुद्द्यावरून संसदेचं कामकाज तहकूब, भाजपकडून आमदार फोडले जात असल्याचा काँग्रेसचा आरोप

Spread the love

कर्नाटकमधील राजकीय अस्थिरतेचे पडसाद संसदेत आज पुन्हा उमटले. कर्नाटक मुद्द्यावरून लोकसभेत काँग्रेसने सभात्याग केला. तर राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे दुपारी २ वाजेनंतर कामकाज तहकूब करण्यात आलं. कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेसने सभागृहात केला. मात्र संरक्षण मंत्री राजनाथसिंहांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले. कर्नाटकातील घटनांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं राजनाथ यांनी सागितलं.

कर्नाटकमध्ये जी काही राजकीय उलथापालथ होतेय त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. काँग्रेसचे हे अंतर्गत प्रकरण आहे. पक्षांतर्गत कलह रोखण्यात अपयशी ठरलेले काँग्रेस नेते मात्र लोकसभेचं कामकाज रोखत आहेत, असं राजनाथसिंह म्हणाले. तर भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन यांनी केला.

कर्नाटकमधील सरकार अस्थिर करण्यात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात आहे, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी केला. कर्नाटकच्या जनतेने निवडणुकीत आम्हाला कौल दिला आहे. भाजपला नाही, असं सिद्धारामय्या म्हणाले. यादरम्यान, काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय. कर्नाटकमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेस-जेडीएसमधील राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या १४वर पोहोचलीय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!