ICC World Cup India vs Newzealand live cricket score: पावसामुळे आजचा खेळ रद्द, उर्वरित खेळ उद्या

Advertisements
Advertisements
Spread the love

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी थांबवण्यात आला आहे. मँचेस्टरच्या मैदानात पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे पंच आणि सामनाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. उर्वरित खेळ हा राखीव दिवशी म्हणजेच बुधवारी खेळवला जाईल. कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ४६.१ षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. यानंतर सुमारे ४ तास पाऊस थांबेल याची वाट पाहिली गेली. पंच आणि सामनाधिकारी यांनी खेळपट्टीची पाहणीही केली, मात्र पाऊस थांबत नसल्यामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान त्याआधी, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर मार्टीन गप्टील अवघ्या एका धावेवर माघारी परतला. जसप्रीतच बुमरहाने त्याचा बळी घेतला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जाडेजाने हेन्री निकोलसचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली. यानंतर मैदानात आलेल्या अनुभवी रॉस टेलरने कर्णधार विल्यमसनच्या साथीने न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. कर्णधार विल्यमसनने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकही झळकावलं. मात्र चहलच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाकडे झेल देत तो माघारी परतला. त्याने ६७ धावांची खेळी केली.

Advertisements

विल्यमसन माघारी परतल्यानंतर रॉस टेलरने डावाची सुत्र आपल्या हातात घेतली. जिमी निशम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमही झटपट माघारी परतले. मात्र टेलरने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं. पावसामुळे खेळ थांबवला गेला तेव्हा टेलर नाबाद ६७ धावांवर खेळत होता. भारताच्या सर्व गोलंदाजांना १-१ बळी मिळाला.

Advertisements
Advertisements

न्युझीलँड              211/5 (46.1)

Ross Taylor       67/85

T Latham            3/4

J. Neesham  (Out )     7  (14)

न्यूझीलंडला पाचवा धक्का, कॉलिन डी-ग्रँडहोम बाद

न्यूझीलंडला चौथा धक्का, जिमी निशम माघारी

हेन्री निकोल्स   (Out)    26/ 45

मार्टिन गप्टिल ( Out )

Kane Williamson  (out)  67/94

केन विल्यमसनने नाणेफक जिंकून फलंदाजी स्वीकारील आहे.  भारताला गोलंदाजीसाठी आमंत्रीत केले आहे.  न्यूझीलंडच्या संघात एक बदल करण्यात आला आहे.

“कोहली आणि विल्यमसन विश्वचषकात एकमेंकासमोर उभे ठाकण्याची काही पहिली वेळ नाही. याआधी दोन्ही कर्णधार विश्वचषकात एकमेंकाविरोधात लढले आहेत. २००८ मध्ये अंडर-१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत झाली होती. सविस्तर वाचा”

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक),  हार्दिक पंडय़ा,  यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार,  जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत.

आपलं सरकार