Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Karnatak : पैशाच्या जोरावर भाजपाचा सत्ता उलटवण्याचा प्रयत्न : काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचा आरोप

Spread the love

पैशाच्या जोरावर सत्ता उलटवण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. कर्नाटक हे ताजे उदाहरण आहे. असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये आज शनिवारी राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसच्या ८ तर जेडीएसच्या ३ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार अल्पमतात येऊ शकते.

कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सुरजेवाला यांनी भाजपावर टीका केली आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांना भाजपा खरेदी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मोदी यांचा अर्थ ‘Mischievously Orchestrated Defections in India (MODI)’ असा सांगितला आहे. यावेळी बोलताना सुरजेवाला यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, रक्षकच भक्षक होत असतील आणि लोकशाही पायदळी तुडवत असतील, तर कसं होणार आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, हे भाजपच्या पचनी पडत नाही. त्यामुळे आमदार खरेदीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या ८ तर जेडीएसच्या ३ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार अल्पमतात येऊ शकते. मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवल्या. मात्र पूर्ण बहुमत नसल्याने सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता काबीज करता आली नाही. त्यानंतर भाजपाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र आता सत्तेतल्या दोन पक्षांमधल्या ११ आमदारांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रकरणावर आपण सोमवारी भाष्य करू असे कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी म्हटले आहे. ११ आमदारांनी राजीनामा दिला असून मी माझ्या कार्यालयाला तो स्वीकारण्यास सांगितले आहे. मला व्यक्तीगत कामामुळे घरी जायचे आहे. उद्या रविवार असल्याने सुट्टी आहे. मी या प्रकरणी सोमवारी भाष्य करेन असे रमेश कुमार यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!