Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ २० जुलै रोजी भव्य मोर्चाचा निर्धार

Spread the love

रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी शुक्रवारी एक बैठक घेऊन ‘नाणार प्रकल्प’ परत आणण्याच्या चळवळीचा कृती आराखडा आखला आहे. त्यानुसार २० जुलै रोजी प्रकल्प समर्थकांचा भव्य मोर्चा आयोजित केला आहे. माळनाक्यापासून या मोर्चाचा प्रारंभ होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो नेण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांना प्रकल्प समर्थकांतर्फे निवेदन देण्यात येणार आहे.

या मोर्च्याच्या आयोजनाबरोबरच प्रस्तावित प्रकल्प परिसरातील जनतेला प्रकल्पाची शास्त्रोक्त माहिती देऊन त्यासंबंधीचे गैरसमज नाहीसे करणे,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील व्यावसायिक आणि जनतेचे समर्थन मिळविणे तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हावासीयांच्या भावना शासनासमोर मांडण्यात येणार आहेत.

नाणार प्रकल्पातून युरो-६ निषकांची पूर्तता करणारे इंधन तयार होमार असल्याने प्रदूषणमुक्त असेल ही वास्तवबाब नागरिकांना समजावून देण्याच्या उद्दीष्टावर व्यावसायिक भर देणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी ग्रीन रिफायनरी याच नावाने या प्रकल्पाची ओळख तयार केली जाईल, असंही आजच्या बैठकीत ठरलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!