Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देशद्रोहाच्या प्रकरणात वायको दोषी, एक वर्षाची शिक्षा

Spread the love

देशद्रोहाच्या प्रकरणात एमडीएमकेचे नेते वायको हे दोषी ठरले आहेत. याप्रकरणात चेन्नईच्या एका न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र वायको यांच्या विनंतीनंतर कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने वायको यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२००९मध्ये चेन्नईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी देशाविरोधी भाषण केल्याचा वायकोंवर आरोप आहे. श्रीलंकेतील अंतर्गत युद्धावर भाषण देताना वायको यांनी दहशतवादी संघटना एलटीटीईचं समर्थन केलं होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्यावर सुनावणी झाली असता कोर्टाने याप्रकरणी वायकोंना दोषी ठरवले. शिक्षा सुनावल्यानंतर वायकोंच्या वकिलांनी कोर्टात याचिका दाखल करून शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केल्यानंतर कोर्टाने आपल्याच निर्णयाला स्थगिती दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!