Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हा तर गोंधळलेला अर्थसंकल्प – जयंत पाटील यांची टीका

Spread the love

देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतोनक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचे आहे याची स्पष्टता त्यात नाहीखरं तर आधीच असलेल्या शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होतेनिर्मला सीतारामन या महागाईबद्दलचे महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतीलअसे अपेक्षित होतेमात्रमहागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाहीयुवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहेदेशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेतत्यावरही कोणताच उपाय या अर्थसंकल्पात केलेला नाही‘, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे

गुरुवारी देशाची आर्थिक पाहणी करण्यात आलीमात्र, ‘या पाहाणीत देखील गोलमाल वाटत असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहेकिमान अर्थसंकल्पात तरी देशाच्या विकासाच्या इंजिनाला भरीव गती देणारे निर्णय घेतले जातीलअसे अपेक्षित होतेमात्रतसे काहीही झालेले नाहीउलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसेलतसेच अर्थमंत्र्यांनी लोकानूनयी निर्णय घ्यायचे नसतातउलट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतातमात्रनिर्मला सीतारामन यांना हे माहितीच नाहीअसे दिसतेकाळा पैसा भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारने बजेटमध्ये या विषयाचा नामोल्लेख सुद्धा केलेला नाही‘.

 शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ – धनंजय मुंडे

दरम्यान केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. परंतु, या अर्थसंकल्पावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ याशिवाय सामान्य जनतेला अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. याशिवाय गेल्या ५ वर्षांचे अपयश झाकण्यात हा अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, ‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘अनर्थ’संकल्प आहे. पेट्रोल-डिझेलवरील करवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे. त्याचे दुष्परिणाम सर्व क्षेत्रावर जाणवतील. सोन्यावरील करवाढीने महिलावर्ग नाराज आहे. आयात पुस्तकांवरील करवाढ विद्यार्थी, युवक आणि बुद्धीजीवी वर्गावर अन्यायकारक आहे. बँकांना दिलेला ७० हजार कोटींचा निधी हा अप्रत्यक्षपणे बड्या कर्जबुडव्यांच्या खिशात जाणार आहे. ‘पीपीपी’ मॉडेलद्वारे रेल्वे खाजगीकरणाचा निर्णय रेल्वेसेवा महाग करणार आहे. मध्यमवर्गीयांसाठी आयकराची मर्यादा आठ लाखांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. अर्थंसंकल्पातील बहुतांश घोषणा लोकभावनेच्या विरोधात आहेत. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलेले नाही. शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ याशिवाय सामान्य जनतेला अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही.’ गेल्या ५ वर्षांचे अपयश झाकण्यात हा अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावर केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!