Modi Sarkar 2 Budget 2019: आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅनकार्डची गरज नाही मात्र आधार असणे गरजेचे

Advertisements
Advertisements
Spread the love

करदात्यांना आयकर भरणा करण्याच्याबाबतीत केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता कर भरताना पॅनकार्ड नसले तरी चालेल. आधार कार्डद्वारेही आयकर भरता येणार आहे. तशी घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. देशातील १२० कोटी नागरिकांकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे आयकर भरताना पॅनकार्ड नसेल तरीही चालेल. त्यांना आधार कार्डद्वारे आयकर भरता येईल, असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी पॅनकार्डला आधार कार्डशी जोडणं बंधनकारक असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यापार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

Advertisements

दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २ ते ५ कोटींचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना आता ३ टक्के अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. ७ कोटींपेक्षा उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना ७ टक्के अतिरिक्त सरचार्ज भरावा लागणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार