Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अर्थसंकल्प देशाला खऱ्या अर्थाने ‘पॉवरहाऊस’ बनविणारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात गरीब, शोषित, वंचित, दलित पीडित, शेतकरी, शेतमजूर, तरुण आणि महिलावर्गांच्या सशक्तीकरणासाठी विशेष पावले उचलण्यात आले असून हा अर्थसंकल्प देशाला खऱ्या अर्थाने ‘पॉवरहाऊस’ बनविणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

देशातील नागरिकांचा आत्मविश्वास वाढला असून या सरकारकडून मोठ्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आज जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जनतेच्या या आशा, आकांक्षांना पूर्ण करण्यासाठीच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. योग्य दिशा आहे, गतीही योग्य आहे आणि त्यामुळे योग्य लक्ष्यावर पोहोचायचे आहे, असा विश्वास या बजेटमधून मिळत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. २१ व्या शतकातील भारताचं स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. २०२२मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सरकारने काही संकल्प आखले आहेत. या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पातून मार्ग मिळेल, असंही मोदींनी म्हटलं आहे.

वंचित, शोषित आणि महिलांच्या सशक्तिकरणाचं माध्यम म्हणून मोदींनी आजच्या अर्थसंकल्पाचा उल्लेख केला आहे. या बजेटद्वारे ५ लाख डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची ऊर्जा देशाला याच पॉवरहाऊसमधून मिळेल, असं ते म्हणाले. या अर्थसंकल्पातून शिक्षण प्रणालीत सुधारणा होईल. गाव आणि गरिबांचा विकास होईल. भावी पिढीचं स्वप्न पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!