Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आमदार नितेश राणेंच्या प्रतापबद्दल नारायण राणे यांची माफी , पोलिसात नितेशविरुद्ध एफ आय आर

Spread the love

उपअभियंत्याशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी खासदार नारायण राणे यांनी माफी मागितली आहे. मुलाचं वर्तन चुकीचं होतं. हायवेवरील खड्ड्यांविरोधातील आंदोलन योग्य होतं, पण नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी केलेली हिंसा चुकीची होती, असं राणेंनी म्हटलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने संतापलेले आमदार नितेश राणे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्याला दमबाजी करत त्यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतलं. त्यानंतर या उपअभियंत्याला धक्काबुक्की करत पुलावरच बांधल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर घेरून अरेरावी करत त्यांच्यावर चिखलफेक केली. या संपूर्ण प्रकारानंतर एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना नारायण राणे म्हणाले, ‘मी त्याला का माफी मागायला सांगणार नाही. जर वडील माफी मागत आहेत तर मुलाने माफी मागायलाच हवी.’

दरम्यान, झाल्या प्रकारानंतर नितेश राणे मात्र कुठल्याही प्रकारे माघार घेण्याच्या पवित्र्यात दिसत नाहीत. ते म्हणाले, ‘ता मी स्वत: हायवेवरील दुरुस्ती कामावर हातात काठी घेऊन लक्ष ठेवणार आहे. रोज सकाळी सात वाजता मी येथे पोहोचेन. मला पाहायचं आहे की सरकारी यंत्रणा आमच्याविरोधात कशी जिंकते. त्यांचा माज उतरवण्याचं औषध माझ्याकडे आहे.’ या संपूर्ण प्रकरणानंतर आमदार नितेश राणेंविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांच्या मागावर असल्याचे समजते. त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!