Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा आरक्षणानंतर राज्य शासनाच्या ‘मेगा भरती’चा मार्ग अखेर मोकळा, राज्यपालांचीही झाली स्वाक्षरी

Spread the love

मराठा आरक्षणानंतर राज्य शासनाच्या ‘मेगा भरती’चा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचे वृत्त आहे . लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती. मात्र मराठा आरक्षण विधेयकामुळे त्या निर्णयाला राज्य सरकारला स्थगिती द्यावी लागली होती. मराठा आरक्षण सुधारणा विधेयकावर बुधवारी राज्यपालांची सही झाल्यानंतर  राजपत्र  जाहीर झालं. आहे . त्यामुळे  मेगा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मराठा समाजाला शैक्षणिक १२ टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षणाचा कायदा १ जुलैपासून लागू झाला  आहे. आठवड्याभरात पहिल्या टप्प्याच्या नोकर भरतीला  सुरुवात होणार असून  आतापर्यंत साधारण २० हजार जागांसाठी जाहीराती  निघाल्या आहेत. राज्यात विविध विभागांमध्ये तब्बल ७२ हजार पदांसाठी ही भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१८ मध्ये केली होती.

या पदांसाठी होणार भरती

कृषी सेवा वर्ग १ आणि २  कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक

सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, पशुधन पर्यवेक्षक

दुग्धविकास

अभियांत्रिकी गट (कनिष्ठ)

दुग्धविकास-अभियांत्रिकी गट, दुग्धसंवर्ध, प्रारण, दुग्धशाळा आणि कृषी पर्यवेक्षक, दुग्धसंकलन विकास अधिकारी आणि तंत्रज्ञ

मत्सव्यवसाय

सहायक आयुक्त, मत्सव्यवसाय विकास अधिकारी, सहा. मत्सव्यवसाय विकास अधिकारी

ग्राम विकास विभाग

आयुर्वेदिक वैद्य, वैद्यकीय अधिकारी-वर्ग 3, अवैद्यकीय पर्यवेक्षक, युनानी हकीम, कृषी अधिकारी, कनिष्ठ अभियंता

विस्तार अधिकारी श्रेणी-2, विस्तार अधिकारी श्रेणी -3, साथरोग वैद्यकीय अधिकारी, सार्व. आरोग्य परिचर, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कृष्ठरोग तंत्रज्ञ,आरोद्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आरोग्य सहा (महिला),विस्तार अधिकारी (कृषी),स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहा.पशुधन विभाग अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक,प्रयोगशाळा सहायक,पर्यवेक्षिका,कनिष्ठ अभियंता,जिल्हा सार्व.परिचारिका,विस्तार अधिकारी (आयु),प्रशिक्षित दाई,विकास सेवा गट-क,गट-ड,

सार्वजनिक आरोग्य विभाग

वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट क (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट ड (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे),

गृह विभाग

पोलीस उप अधीक्षक,वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकरी,सहायक गुप्ता वार्ता अधिकारी,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस शिपाई,

सार्वजनिक बांधकाम

सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

मृद व जलसंधारण विभाग

सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

वित्त विभाग

सहायक संचालक,कनिष्ठ लेखापाल

आपलं सरकार

Click to listen highlighted text!