Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला ४० जागांचा प्रस्ताव , १० दिवसात उत्तर द्या अन्यथा आमच्याकडे २८८ उमेदवार तयार

Spread the love

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसलाच अल्टीमेटम दिलाय. काँग्रेसकडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. सर्व काही बातम्यांमधून समजतंय. पण काँग्रेसला आम्ही ४० जागा द्यायला तयार आहोत, त्यांनी याबाबतचा निर्णय १० दिवसांच्या आत कळवावा, अन्यथा २८८ जागा लढण्यासाठी सक्षम आहोत, असंही वंचितने म्हटलंय. वंचितच्या वतीने अण्णा राव पाटील, गोपीचंद पडळकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे . लोकसभा निवडणुकीत आम्हाला जास्त मतं मिळाली होती, हे कारण देत वंचितने हा अल्टीमेटम दिला. येत्या 10 दिवसात काँग्रेसने निर्णय न कळवल्यास स्वबळावर लढणार असल्याचंही वंचित आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची तयारी दाखवली असली तरी वंचित काँग्रेससोबत जाण्यास तयार नसल्याचे दिसत असून, आता वंचित बहुजन आघडीने आम्ही काँग्रेसला ४० जागा सोडत आहोत, असे सांगत काँग्रेसवर टीका केली. महासचिव गोपीचंद पडळकर यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस वंचितला जाणीव पूर्वक बदनाम करत असून, आता आम्ही काँग्रेसला ४० जागा सोडत असल्याचा प्रस्ताव दिला. काँग्रेसला कोणत्या ४०  जागा हव्यात ते त्यांनी आम्हाला सांगावं, असंही वंचितने स्पष्ट केलं.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे काँग्रेसला आमचा प्रस्ताव मान्य असल्यास तर त्यांनी १० दिवसांत आमच्याशी संपर्क साधावा, असे देखील पडळकर म्हणाले. तसेच जागाबाबत कुणीही वंचितचा पदाधिकारी काँग्रेसला भेटला नाही मात्र जाणीवपूर्वक माध्यमातून उलट सुलट चर्चा घडवून आणल्या जात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचितला जास्त मते मिळाली असून, आता आम्ही काँग्रेसला किती जागा सोडणार हे ठरवणार आहोत, असे देखील ते म्हणालेत. तसेच ईव्हीएमबाबत काँग्रेसने अजूनही भूमिका घेतलेली नसून त्यामुळे कॉंग्रेसबद्दल आमच्या मनात संभ्रम असल्याचे ते यावेळी म्हणाले.

एवढेच नाही तर २०१४ आणि २०१९ ची परिस्थिती वेगळी असून, ज्यांना काँग्रेस अथवा भाजपामधून तिकीट मिळणार नाही ते आमच्या संपर्कात असल्याचे देखील पडळकर म्हणाले. तसेच वंचित भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. मात्र त्याचा खुलासा मात्र काँग्रेस करू शकलेली नसल्याचे सांगतआम्हाला ४१ लाख मत मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेस घाबरल्याचे पडळकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असा आरोपही काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या काळात केला होता. निवडणुकीत आम्हाला ४१ लाख मतं मिळाली आहेत. त्यामुळे याबाबत काँग्रेसने खुलासा करावा, असंही अण्णा राव पाटील म्हणाले. २०१४ आणि २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस आणि भाजपात तिकीट मिळणार नसलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला

आपलं सरकार

Click to listen highlighted text!