Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नवलाई : या सुलतानची बातमी तर पहा !! मुक्काम पोस्ट पोलीस ठाणे …

Spread the love

हे वृत्त आहे एका कुत्र्याचे !! कत्र्याविषयीच्या कथा आहेत .  मात्र हि कथा थोडी वेगळी आहे . असे नेहमीच म्हटले जाते कि , कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे . इथे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही या सुलतानपुढे हतबल झाले आहेत . याचे एक उदाहरण मध्य प्रदेशात पहायला मिळत आहे. सुलतान नाव असणाऱ्या एका लॅब्रेडॉरला पोलीस ठाण्यात आपलं नवं घर मिळालं आहे. आता छोटी बजरिया पोलीस ठाण्यातील कर्मचारी या कुत्र्याची काळजी घेण्यात व्यस्त आहेत. महत्त्वाचं म्हणजे सुलतानच्या मालकाची कुटंबासहित हत्येच्या गुन्ह्यात जेलमध्ये रवानगी कऱण्यात आली आहे. तेव्हापासून तो पोलीस ठाण्यातच ठाण मांडून बसला आहे.

२१ जून रोजी सुलतानच्या मालकाची कुटुंबातील इतर सहा सदस्यांसोबत हत्येच्या गुन्ह्यात जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्यांनी आपल्याच नातेवाईकांची हत्या केली होती. संपत्तीवरुन झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली होती.

कुटुंबाला अटक केल्यानंतर सुलतानने अन्न आणि पाणी सोडून दिलं होतं. आम्ही त्याच्या मालकाला अटक केल्यानंतर सुलतान चिडलेला होता. पण आता तो आमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे झाला आहे. सुलतान आता पोलीस ठाण्यातच अदिकाऱ्यांसोबतच विश्राम करतो. पोलीसदेखील त्याच्यासाठी घरचं अन्न आणतात.

पोलीस ठाण्याच्या प्रमुख मनिषा तिवारी यांना जेव्हा सुलतानबद्दल कळलं तेव्हा त्यांनी त्याची काळजी घ्यायचं ठरवलं. ‘सुलतानच्या मालकाने पाच जणांची हत्या केली आहे. त्याची काळजी घेण्यासाठी घरात कोणीच नसल्या कारणाने आज तो येथे आहे. आम्ही त्याला अन्न आणि पाणी पुरवत आहोत’, अशी माहिती मनिषा तिवारी यांनी दिली आहे.

आता पोलीस स्टेशन हे सुलतानचं दुसरं घरं झालं आहे. जर कोणी तयार असेल तर आम्ही सुलतानला दत्तक देण्यास तयार आहोत अशी माहिती मनिषा तिवारी यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!