Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Social Media : फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप डाऊन ! सोशल मीडियाचं डाऊनलोड बंद, युजर्स त्रस्त , फेसबुकची दिलगिरी …

Spread the love

इंटरनेटच्या महाजालातील सर्वात लोकप्रिय असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स डाऊन झाले आहेत. या तिन्ही ठिकाणी फोटो डाऊनलोड करताना युजर्सना अडचणी येत आहेत. सोशल मीडियाच्या व्यासपीठावर संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक ही तिन्ही महत्त्वाची माध्यमं एकाच वेळी डाऊन झाल्यानं युजर्सची कोंडी झाली आहे. याचे पडसाद ट्विटरही उमटले आहेत. ट्विटरकर चांगलेच सक्रीय झाले असून #whatsappdown #instagramdown #facebookdown हे तिन्ही हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहेत.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर मुख्यत्वे: फोटो डाऊनलोड करताना अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया ट्विटरकरांनी दिल्या आहेत. फेसबुकनही फोटो आणि व्हिडिओ संदर्भात युजर्सला अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं मान्य केलं आहे. यासंबंधीचं ट्विट फेसबुकच्या हॅण्डलवर करण्यात आलं आहे.

Facebook, WhatsApp आणि Instagram जगभरात डाऊन झालं आहे. गेल्या एक तासापासून व्हॉट्सअॅप वापरण्यात अनेकांना अडचणी येत आहेत. व्हॉट्सअॅपवरचे व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचं अनेकांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडचणी येत असल्याचा तक्रारी केल्या आहेत. तसेच भारतातले युजर्सही प्रभावित झाले आहेत. युरोप, दक्षिण अमेरिका, जपानसारख्या देशांत Facebook, WhatsApp आणि Instagram वापरण्यात अडथळे येत आहेत. मलेशिया, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्येही युजर्सना फेसबुक आणि  WhatsApp वापरण्यात अडथळे येत आहेत. जगभरातल्या कोट्यवधी लोकांना सध्या याचा अनुभव येत असून, फोटो पाठवण्यासह डाऊनलोडसुद्धा करता येत नाही आहेत. अनेकांनी ट्विटर तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवर यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत.

सोशल मिडियावर सर्वात जास्त वापर असणारे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्स अॅप आज दुपारपासूनच अत्यंत मंद गतीने सुरू आहेत. विशेषत: युरोप व अमेरिकेत हे जास्तप्रमाणत जाणवत आहे. तर व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक ही तिन्ही संवाद साधण्याची महत्त्वाची माध्यम एकाच वेळी मंद झाल्यानं वापरकर्त्यांची अडचण झाली आहे. याचे प्रतिक्रिया ट्विटरही उमटत आहेत.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्स अॅप हे तिन्ही अॅप एकाच कंपनीचे आहेत. मात्र दुपारपासून यांच्या वापरकर्त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये फोटो नीट अपलोड होत नाही, वेग मंदावणे अशा काही अडचणींचा समावेश आहे. डेली मिररने म्हटल्याप्रमाणे दुपारी २.४९ मिनिटांपासून ही अडचण जाणवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्टच आहे. या अडचणींचा सामना केलेल्या ८२ टक्के वापरकर्त्यांचे इन्स्टाग्रामवर म्हणणे आहे की, माहिती टाकण्यासाठी अडचण येत आहे. ११ टक्के वापरकर्त्यांना वेबसाइटसाठी तर सहा टक्के जणांना लॉग इनसाठी अडचण येत आहे. या तिन्हींची मालकी असलेल्या फेसबुकने मात्र अद्यापपर्यंत यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!