Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Modi Sarkar 2 : एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार

Spread the love

आर्थिक अडचणींमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या एअर इंडियाचे अखेर खासगीकरण केले जाणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. एअर इंडिया ही कंपनी चालवणे आता अशक्य असून कंपनीला दररोज १५  कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. कंपनीला २० विमानांची कमतरता जाणवत असून कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी निर्गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे पुरी म्हणाले.

मुंबई विमानतळ बंद झालेले नाही अशी माहितीही पुरी यांनी राज्यसभेत दिली. एका धावपट्टीवरून दर तासाला ४५ उड्डाणे होत असत. मात्र आता ३६ उड्डाणे होत आहेत. विमानतळावर काही अडचणी असून त्या लवकरच दूर केल्या जातील असेही पुरी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!