Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Modi Sarkar 2 : संसदेत मांडले जाणार वेतन संहिता विधेयक , कामगार कायद्यात सुधारणा करण्यासाठी सरकारचे पाऊल

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच वेतन संहिता (Wage Code) विधेयकाला मंजूरी दिली. आता हे विधेयक संसद सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दरम्यान, या विधेयकाबाबत अधिक  माहिती देण्यास जावडेकर यांनी नकार दिला. मात्र, सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक सभागृहात चर्चेला येऊ शकते. दरम्यान, हे विधेयक १० ऑगस्ट २०१७ मध्येच लोकसभेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर २१ ऑगस्ट २०१७ मध्येही हे विधेयक संसदेच्या सँडिंग कमेटीकडे पाठविण्यात आले होते. कमेटीने १८ डिसेंबर २०१८ रोजी आपला अहवाल दिला. १६ वी लोकसभा विसर्जित झाल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यांनी दिलेले वृत्त असे की, हे विधेयक वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि कल्याण तसेच औद्योगिक संबंध यावर आधारीत चार संहितांपासून तयार करण्यात आले आहे. या चारी संहिता ४४ जुन्या कामगार कायद्याची जागा घेतील. हे विधेयक मजूरी वेतन अधिनियम १९३६, सरासरी मजूरी कायदा 1948, Bonus Payment Laws 1965 आणि Equal Remuneration Act 1976 ची जागा घेईल. दरम्यान, हे विधेयक मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाल्यास सर्वांना समान वेतनाची संधी मिळू शकते. केंद्र सरकारला काही विशेष क्षेत्रांमध्येही समान वेतन देण्याचा अधिकार मिळेल. यात रेल्वे, खाण यांसारखी प्रमुख क्षेत्रं आहेत. इतर प्रकारची वेतन श्रेणी निश्चित करण्यासाठी घटक राज्ये स्वतंत्र असतील. या विधेयकाच्या माध्यमातून एक राष्ट्रीय किमान वेतन रक्कम निश्चित केली जाईल. म्हणजे संबंधित कंपनी, विभाग आंदींना किमान वेतन रकमेपेक्षा कमी वेतन कर्मचाऱ्याला देता येणार नाही. या विधेयकात तरतूद आहे की, प्रत्येक पाच वर्षांनंतर वेतन रक्कम निश्चितत बदल केला जाईल.

या विधेयकात किमान वेतन निश्चिती रकमेपेक्षा कमी वेतन देणाऱ्या व्यवस्थापन , विभाग, कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही तरतूद आहे. जर कोणी एकादी कंपनी, विभाग आपल्या कर्मचाऱ्याला ठरलेल्या वेतनापेक्षा कमी रक्कम देत असेल तर, त्या कंपनीला ५० हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. पाच वर्षात संबंधित कंपनी, विभाग, व्यपस्थापन आदींनी अशाच प्रकारची चूक कल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास आणि १ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा मिळू शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!