Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Modi Sarkar 2 : आयकराविषयी काय असेल २०१९ च्या पूर्ण अर्थसंकल्पात ?

Spread the love

शुक्रवारी ५ जुलैला मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर होत आहे . यावेळी वैयक्तिक करदात्यासाठी कर सवलतीची मर्यादा २.५ लाख रुपयाच्या पुढे जाऊ शकते. यासोबत १० कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळकत असलेल्यांना ४० टक्क्यांच्या वरच्या दरानं इन्कम टॅक्स बसू शकतो. केपीएमजीच्या एका सर्वेमध्ये हे समोर आले आहे.

केपीएमजी ( इंडिया )च्या २०१९-२०च्या सर्वेत वेगवेगळ्या उद्योगांच्या २२६ लोकांचा विचार केला गेलाय. सर्वेत सामील असलेल्या ७४ टक्के लोकांनी आपली मतं मांडली. त्यात असं म्हटलं की वैयक्तिक इन्कम टॅक्समध्ये सवलत ही २.५ लाख रुपयांच्या पुढे वाढवली जावी. तर ५८ टक्के लोकांचं म्हणणं होतं की सरकारनं १० कोटी रुपयांहून जास्त कमाई करणाऱ्या सुपर रिच लोकांवर ४० टक्के कर लावू शकते. सर्वेमध्ये १३ टक्के लोकांचं म्हणणं होतं की Inheritance Tax परत घेता येऊ शकतो. १० टक्क्यांनी सांगितलं वेल्थ टॅक्स -इस्टेट शुल्क पुन्हा लागू करता येईल.

मोदी सरकारला रियल इस्टेट सेक्टरमधली मंदी संपवायची आहे. म्हणून बजेटमध्ये ठोस पावलं उचललेली दिसू शकतात. याच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अर्थ मंत्रालय विचार करतंय. या पर्यायांमध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात आणि प्रिन्सिपलवर कर सवलत वाढवली जाऊ शकते. आता ती किती वाढवली जाईल, याचे विविध मार्ग असू शकतात. ५३ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, अर्थमंत्री निर्मला सीतारामण ५ जुलै रोजी सादर होणाऱ्या बजेटमध्ये थेट करात फार बदल करतील असं वाटत नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!