Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : भावी पत्रकार विद्यार्थिनीला मैत्रीचे प्रपोजल दिले आणि सुरु झाली फौजदाराची चौकशी , पोलीस आयुक्तांची कारवाई

Spread the love

औरंगाबाद – तपासाचा बहाणा करंत शनिवारी पहाटे साडेतीन वा. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचा पी.एस.आय. माधव पुरी याने जर्नालिझम च्या विद्यार्थीनीला आपण मित्र होऊ शकतो का ? असा मॅसेज पाठवल्या मुळे चिडलेल्या तरुणीने पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या कडे तक्रार दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याचे पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

२८ जून रोजी जानकी हाॅटेल गारखेडा परिसरातील एक तरुणी भावाला वाढदिवसाचे गिफ्ट आणण्यासाठी बाहेर पडली पण उशीरापर्यंत ती न परतल्यामुळे तिचे पालक, मित्र आणि मैत्रीण यांनी हरवलेल्या तरुणीचा शोध सुरु केला. पण हरवलेली तरुणी फोन उचलंत नसल्यामुळे तिच्या मैत्रिणीने पोलिस नियंत्रण कक्षाच्या १०० नं वर माहिती दिली. नियंत्रण कक्षाने या प्रकरणाची दखल घेत पुंडलिकनगर पोलिसांना कळवले. त्यानंतर तातडीने घटनास्थळी पोलिसांचे पथक पोहोचल्यानंतर त्या पथकात असलेल्या पी.एस.आय. माधव पुरी ने हरवलेल्या तरुणीच्या मैत्रिणीचा मोबाईल नं , नाव घेतले.

दरम्यान हरवलेली तरुणी पुण्यात शिवाजी नगर भागात पहाटे २.३० वा. सापडली. हरवलेल्या तरुणीला आपण पुण्यात कसे पोहोचलो आठवत नव्हते. फक्त शुक्रवारी घराबाहेर पडल्यावर दोन तरुण भेटल्याचे आठवते. या भामट्यांनी हरवलेल्या तरुणीचा मोबाईल, रौख रक्कम सोन्याची बांगडी आणि अंगठी लंपास केली. त्याच वेळैस औरंगाबादेत पी.एस.आय. पुरी ने हरवलेल्या तरुणीच्या मैत्रीणीकडून घेतलेल्या मोबाईल नं.वर  We can make frnd ?असा मेसेज पाठवला. याप्रकाराने चिडलेल्या तरुणीने शनिवारी पोलिसआयुक्तांची भेट घेत तक्रार दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!