Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दुचाकी चोर भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात, १९ गाड्या पोलिसांनी केल्या जप्त 

Spread the love

चोरीच्या दुचाकीवरुन मंगळसूत्र हिसकावणारे मोकाट

अंगात सैलानी बाबाची सवारी असल्याची थाप मारुन भिक्षा मागणा-या दुचाकी चोर भोंदूबाबासह त्याच्या साथीदाराला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल १९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या दोघांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह््यात चोरलेल्या दुचाकींची कवडीमोल भावात विक्री केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, यातील एका दुचाकीवरुन दोघांनी दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याचे सीसी टिव्हीत कैद झाले आहे. पण मंगळसूत्र चोर मात्र मोकाटच आहे. त्यामुळे या दोघांनी मंगळसूत्रही चोरी केल्याचा संशय निर्माण झाला आहे. अथवा ही दुचाकी अज्ञातस्थळी सापडली असावी असा कयास बांधला जात आहे. भोंदूबाबा अशोक मानसिंग तामचिकर (२८, रा. बलूची गल्ली, नारेगाव) आणि त्याचा साथीदार प्रदीप बाबुराव जाधव (२५, रा. नारेगाव) अशा दोघांच्या गारखेडा परिसरातून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मागील आठ महिन्यांपासून भोंदूबाबा म्हणून अशोक तामचिकर मिरवत होता. नागरिकांना तो अंगात सैलानी बाबाची सवारी असल्याचे सांगून तो भिक्षा मागायचा. भिक्षा मागत असतानाच तो रेकी देखील करायचा. त्यानंतर रात्री घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी साथीदार प्रदीप जाधवच्या मदतीने लांबवायचा. दुचाकी चोरण्यासाठी दोघांकडे एक मास्टर चावी देखील होती. वेळप्रसंगी ते दुचाकीचे हँडल लॉक तोडून लांबवायचे. तसेच चोरलेली दुचाकी जालना जिल्ह््यातील दुर्गम भागात नेऊन तेथे ग्राहक शोधायचे. ग्राहक मिळताच त्याला कवडीमोल भावात दुचाकीची विक्री करुन दोघेही दैनंदिन गरजा भागवत होते. तसेच दुचाकींची विक्री करताना ती स्वत:च्या मालकीची आहे. फायनान्स कंपनीचे हफ्ते थकल्याची थाप मारुन केवळ हजार ते दोन हजारात विकायचे. याशिवाय ग्राहकांना दुचाकी काहीच महिने वापरा अन्यथा फायनान्स कंपनीचे अधिकारी ओढून नेतील. तसे न झाल्यास दुचाकी तुमचीच असे सांगायचे.

…….

असे अडकले जाळ्यात…..

नारेगावातील भोंदूबाबा अशोक तामचिकरकडे दुचाकी कोठून आली. त्यावरुन एकाने सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र  माळाळे यांना माहिती दिली. त्यावरून उपनिरीक्षक ताहेर पटेल, सुरेश जारवाल, जमादार मुनीर पठाण, सोमनाथ कोलते, प्रकाश घुगरे, शाहेद शेख, गणेश राजपुत, दीपक शिंदे, नितेश सुंदर्डे यांनी तामचिकरच्या नारेगावातील घराची झडती घेतली. तेव्हा दुचाकीच्या वेगवेगळ्या नंबरप्लेट आढळल्या. त्यानंतर त्याचा शोध घेऊन गारखेडा परिसरात त्याला पकडण्यात आले.

…….

चोरीच्या दुचाकीवर मंगळसूत्रे हिसकावली…..

रोशनगेट परिसरातील अरबाज खान अमजद खान (रा. शरीफ कॉलनी) हे लोकसभा मतदानाची धामधुम संपल्यावर घरी गेले होते. रात्री त्यांनी घरासमोर दुचाकी (एमएच-२०-सीव्ही-२०८०) उभी केली होती. मात्र, चोराने मध्यरात्री त्यांची दुचाकी लांबविली. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यावर अरबाज खान यांनी जिन्सी पोलिस ठाणे गाठले. तेव्हा पोलिसांनी चोरीला गेलेल्या दुचाकीची रजिस्टरमध्ये नोंद केली. यावेळी अरबाज खान यांना परिसरात दुचाकी सापडली तर कळवा असे म्हणत पाठवून दिले. पण २४ एप्रिल रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास सिडको, एन-१ भागातील काळा गणपतीचे दर्शन घेऊन जळगाव रोडवरील सर्व्हिसरोडवर आलेल्या पुष्पावती गोपाळराव गंटा (७२, रा. सत्यमनगर, सिडको) यांचे अरबाज खान यांच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी ६४ ग्रॅमचे मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावली होती. तसेच बीड बायपासवरुन देखील एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावले होते. या घटनेचे सीसी टिव्ही फुटेजचे फोटो दैनिकात छापून आले होते. ते फोटो पाहून अरबाज खान अवाक् झाले होते. दरम्यान, या दोघांचा मंगळसूत्र चोरीत देखील समावेश असल्याचा संशय आहे. अन्यथा ही दुचाकी तरी बेवारस आढळली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!