Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सक्तीने कर्जवसुलीसाठी बाउन्सर पाठवण्याचा अधिकार बँकांना नाही : केंद्रीय राज्यमंत्री

Spread the love

बँका अनेकदा थकित कर्जवसुलीसाठी बाऊन्सर्स पाठवतात. लोकसभेत यावर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की ग्राहकांकडून बळजबरी कर्जवसुली करण्यासाठी बाउन्सर पाठवण्याचा अधिकार कोणत्याही बँकेला नाही. जर कोणी अशा प्रकारे रिकव्हरी एजंट्सद्वारे गैरव्यवहार करत असेल तर अशा घटनांची गांभीर्याने दखल घेतली जात आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

अनुराग ठाकूर म्हणाले, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे स्पष्ट निर्देश आहेत की योग्य पोलीस पडताळणी आणि दुसरी संबंधित औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच पैसै वसूल करण्यासाठा एजंट्स पाठवू शकता येतील.’ प्रश्नोत्तरांच्या तासाला ठाकूर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. कोणाकडेही बळजबरीने कर्जवसुलीसाठी बाउन्सर पाठवण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!