अखेर असे काय झाले कि , दंगल गर्ल झायरा का घेतेय सिनेजगताचा निरोप ?

Advertisements
Advertisements
Spread the love

‘दंगल’ या चित्रपटात गीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. १८ वर्षांच्या झायराने इतक्या लहानशा वयात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण करिअरच्या ऐन सुरुवातीला झायराने बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेऊन चाहत्यांना जोरदार धक्का दिला.
झायराने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपला निर्णय चाहत्यांशी शेअर केला आहे. ‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी…’, असे झायराने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता.

Advertisements

या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण इतक्या लहान वयात मी इतका मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी नाते तोडते आहे. मी अतिशय विचारपूर्र्वक हा निर्णय घेतला आहे…’, असे झायराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. झायराची ही पोस्ट सहा पानांची आहे. यात कुराणचाही उल्लेख आहे. मी अल्लाहने दाखवलेल्या मार्गापासून दूर जातेय, असेही या पोस्टमध्ये लिहिले आहे.
झायराची ही पोस्ट वाचून साहजिकच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. झायराने ही पोस्ट दबावाखाली लिहिल्याचे मतही अनेक चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

Advertisements
Advertisements

‘दंगल’ हा झायराचा पहिला सिनेमा होता. २०१६ साली या सिनेमासाठी झायराला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटानंतर पुढच्याच वर्षी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात झायरा झळकली होती. या सिनेमासाठीही तिला फिल्मफेअरचा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस क्रिटिक्स हा पुरस्कार मिळाला होता. लवकरच झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. झायराने खरोखरीच चित्रपट संन्यास घेतला असेल तर ‘स्काय इज पिंक’ हा तिचा अखेरचा चित्रपट असणार आहे.

आपलं सरकार