Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : खदानीतील पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा करूण अंत

Spread the love

औरंंंगाबाद पैठण रोडवरील नक्षत्रवाडी येथे असलेल्या खदानीतील पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा करूण अंत झाला. ही घटना २८ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुषार प्रकाश शिरसाट (वय १२), प्रदीप भगवान काजळे (वय ९) दोघे राहणार नक्षत्रपार्वâ, नक्षत्रवाडी, पैठणरोड असे मयत चिमुकल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार शिरसाट हा इयत्ता सहावीमध्ये उज्वलाताई पवार हायस्कुलमध्ये शिकत होता. तर प्रदीप काजळे हा नुतन हायस्कुलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तुषार आणि प्रदीप खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडले होते. नक्षत्रवाडी येथील पंपहाऊस जवळ असलेल्या खदाणीत पावसाचे पाणी साचले आहे. तुषार आणि प्रदीप हे दोघेही फिरत-फिरत खदाणीत साचलेल्या पाण्याजवळ आले होते. दोघांनी अंगातील कपडे काठावर काढुन ठेवत पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. परंतु दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले.

सायंकाळी उशिरापर्यंत तुषार आणि प्रदीप घरी न परतल्याने त्यांच्या आई-वडीलांनी सर्वत्र शोध घेण्यास सुरूवात केली. रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास तुषार व प्रदीपचे नातेवाईक दोघांचा शोध घेत खदाणीजवळ आले असता त्यांना काठावर दोघांचे कपडे मिळून आले. तुषार व प्रदीप पाण्यात बुडाले असल्याचा संशय आल्याने गावातील काही पोहणाऱ्या  युवकांनी पाण्यात उतरून दोघांचा शोध घेतला असता, प्रदीप व तुषार दोघेही पाण्यात बेशुध्दावस्थेत मिळून आले. दोघांना तात्काळ उपचारासाठी घाटीत दाखल केले असता रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दोघांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बनावट कागदपत्राआधारे फ्लॅटची विक्री

विक्री केलेल्या फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून तो फ्लॅट दुसNयाला विकणाNया बिल्डरविरूध्द मुकुंदवाडी  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र मदनलाल सुराणा असे बिल्डरचे नाव असून सिडको एन-२ परिसरातील के.सी.कॉम्पलेक्समधील फ्लॅट क्रमांक ५ सुराणा यांनी २ लाख ९० हजारात गिरीश वसंतराव बडगे (वय ५५, रा.नाथप्रांगण, गारखेडा परिसर) यांना विक्री केला होता. दरम्यान, सुराणा याने गिरीश बडगे यांना विक्री केलेल्या फ्लॅटचे बनावट कागदपत्रे तयार करून तो फ्लॅट अ‍ॅड. श्रीकांत कुलकणर््ीा यांना विक्री केला होता. हा प्रकार बडगे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिल्डर राजेंद्र सुराणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!