Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PNB Scam : हिरे व्यापारी नीरव मोदीला मोठा दणका, बँकांची खाती गोठवली !!

Spread the love

पंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला तपास यंत्रणांनी मोठा दणका दिला आहे. स्वित्झर्लंड येथे नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदीशी संबंधित चार बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २८३.१६ कोटी रुपये जमा होते. ही संपूर्ण रक्कम गोठवण्यात आली आहे. स्विस बँकेने याबाबतचं एक निवेदन जारी केलं आहे. भारताच्या मागणीनंतर नीरव मोदीची बँक खाती गोठवण्यात आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यात तपास यंत्रणांना आलेलं हे दुसरं यश आहे. याआधी या घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याचं वृत्त आलं होतं. आम्ही चोक्सीचं नागरिकत्व रद्द करत आहोत, असं अँटिगुआच्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं.

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करून मोदी भारताबाहेर पसार झाला आहे. त्याने मामा मेहुल चोक्सीच्या साथीने हा महाघोटाळा केला होता. याप्रकरणी सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू असून मोदी व चोक्सीची ४ हजार ७६५ कोटींची संपत्ती यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मोदीची पत्नी अमी हिच्याविरुद्धही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!