Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jersey War : टिम इंडियाच्या “जर्सी”वरून वादळ , काँग्रेस- सपा चा भगवीकरणाला विरोध तर टिम इंडियाचे प्रशिक्षक म्हणतात …..

Spread the love

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप -२०१९ मध्ये इंग्लंडविरोधात खेळल्या जाणाऱ्या सामन्या दरम्यान भारतीय संघाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवरून वाद निर्माण झाला आहे. देशातील प्रमुख राजकीय व भाजपच्या विरोधी पक्षांनी यावर आक्षेप नोंदवत पंतप्रधान मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. काँग्रेस व समाजवादी पार्टीने जर्सीचा रंग भगवा केल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.

या दोन्ही पक्षांचे म्हणने आहे की, बीसीसीआयने केवळ केंद्र सरकारला खुश करण्यासाठी हा रंग निवडला आहे. तर भाजपाकडू हा आरोप फेटाळण्यात आला आहे. याशिवाय आयसीसीने म्हटले आहे की, ही रंगसंगती त्यांच्याकडून बीसीसीआयला पाठवण्यात आली होती. भारत व इंग्लड दरम्यान ३० जून रोजी बर्मिंघम येथे सामना होणार आहे.

सध्यातरी अधिकृतरित्या भारतीय संघाची ही नवी जर्सी समोर आलेली नाही. मात्र सोशल मिडियावर या नव्या जर्सीचे वेगेवगळे फोटो फिरत आहेत. मात्र हे निश्चित झाले आहे की इंग्लड विरूद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या जर्सीवर भगवा रंगही असणार आहे.

प्रशिक्षक भारत अरुण म्हणतात आमच्यासाठी खेळ महत्वाचा ….

दरम्यान विंडीजविरुद्ध सामन्याआधी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी मात्र जर्सीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं.  ते म्हणाले कि , “खरं सांगायचं तर आम्ही कोणत्या रंगाची जर्सी घालणार आहोत याची आम्हाला माहिती नाहीये. आम्ही या गोष्टीचा विचारही करत नाही. आमच्यासमोर गुरुवारी होणारा विंडीजचा सामना हे पहिलं उद्दीष्ट आहे. We Bleed Blue ! ” पत्रकारांनी जर्सीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला भारत अरुण यांनी उत्तर दिलं. गुरुवारी भारत आणि विंडीज यांच्यात सामना होणार असून रविवारी भारतासमोर यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे.

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ, ICC ने आखून दिलेल्या नियमानुसार Home आणि Away सामन्याकरता वेगळी जर्सी घालून मैदानात उतरणार होता. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भारतीय संघाच्या भगव्या जर्सीच्या चर्चा सुरु होत्या. बुधवारी संध्याकाळी ANI वृत्तसंस्थेने भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध सामन्यात भगव्या रंगाची जर्सी घालून उतरणार असल्याची माहिती दिली. मात्र अद्यापही या जर्सीवरुन सावळा गोंधळ सुरुच असल्याचं पहायला मिळतंय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!