Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC world Cup : सट्टेबाजांसोबत फौजदारही झाला निलंबित , चौघांना अटक , मुंबई पोलिसांची कारवाई

Spread the love

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये जगभरातून कोट्यवधींचा सट्टा लावला जात असताना सट्टेबाजांमध्ये पोलिसाचा सहभाग असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माटुंगा पोलिसांनी मंगळवारी दादर येथील एका हॉटेलमध्ये छापा टाकून एका बुकीसह पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली. ज्ञानेश्वर खरमाटे असे उपनिरीक्षकाचे नाव असून तो भायखळा पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहे.  दरम्यान, ज्ञानेश्वर खरमाटे याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दादर रेल्वे स्थानकासमोरील गेस्ट लाईन हॉटेलमधून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल सावंत, मारुती शेळके यांच्या पथकाने या हॉटेलच्या सातव्या मजल्यावरील ७०६ क्रमांकाच्या खोलीत छापा टाकला. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या सामन्यावर मोबाइलच्या माध्यमातून सट्टा घेतला जात असल्याचे दिसून आले. पंटर आणि मेहुल जैन या बुकींकडून मिकीन शहा, मनीष सिंग, प्रकाश बनकर हे तिघे सट्टा घेत होते. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे हा देखील या ठिकाणी उपस्थित होता. उपस्थितीबाबत तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. चौकशीत त्याचाही यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट होताच तिघांसह खरमाटे यालाही अटक करण्यात आली. न्यायालयाने या चौघांची जामिनावर सुटका केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!