Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC Cricket World Cup 2019 Ind vs WI Live Updates : भारताचा अखेर वेस्ट इंडिजवर विजय…  आणि सोबत महत्वाच्या बातम्या ….

Spread the love

भारत : 268/7  (50)                       वेस्ट इंडिज : 143 (33.1)

Bowling:                                          Batting:

मोहम्मद शमी: 2/9 (5.5)                    ओ थॉमस  : Out (6/11)

यजुवेंद्र चहल : 2/39 (7.0)                  केमार रोच : 14/21

 

जिंकण्याची शक्यता : भारत : 99.5%    वेस्ट इंडिज : 0.5%

.

शिमोन हेटमीर : Out 16/24

कार्लोस ब्रॅथवाइट : Out (1/5)

फैबियन एलन : Out (0/1)

25 षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज 5 बाद 101 धावा.

यजुवेंद्र चहलच्या फिरकीवर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर झेलबाद, वेस्ट इंडिज ५ बाद ९८ धावा.

जेसन होल्डर : Out (6/13)

सुनील एम्ब्रिस : Out (27/38)

15 षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज २ बाद 50 धावा.

वेस्ट इंडिजची दुसरी विकेट; मोहम्मद शमीने शाय होपला केलं क्लीनबोल्ड

शाही होप : Out (5/10)

भारतीय संघाला पहिलं यश मिळालं, शमीनं ख्रिस गेलला(६) केलं बाद

ख्रिस गेल : Out (6/19 )

बुमराहच्या षटकात केवळ १ धाव, दोन षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज बिनबाद ५ धावा.

पहिल्या षटकात वेस्ट इंडिजच्या बिनबाद ४ धावा.

भारतीय संघाकडून पहिलं षटक टाकतोय मोहम्मद शमी 

वेस्ट इंडिजची सलामीजोडी ख्रिस गेल आणि सुनील अम्ब्रीस फलंदाजीसाठी मैदानात

५० षटकांच्या अखेरीस भारत: ७ बाद, २६८ धावा, वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २६९ धावांचं आव्हान

एम एस धोनी  56 / 61

कुलदीप यादव 0/1

मोहम्मद शमी Out  (0/2)

हार्दिक पांड्या ४६ धावांवर बाद

हार्दिक पांड्या Out  (46/37)

विराट कोहली   Out ( 72 /82)

भारतीय संघाला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली ७२ धावांवर बाद

भारताला चौथा धक्का केदार जाधव बाद

रोहित शर्मा बाद     18 /22  भारताला दुसरा धक्का

लोकेश राहुल बाद    43 /60

राहुलचे अर्धशतक हुकले; भारताला दुसरा धक्का

रोहित शर्मा बाद; भारताला पहिला धक्का

 

इतर महत्वाच्या बातम्या एक नजर

औरंगाबाद : विकी भारद्वाज , वय ४० हा इसम जनशताब्दी एक्सप्रेसमधून पडला होता , त्याला उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .

दिल्लीः पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

पुण्यात रात्री साडेआठपर्यंत ७२.४ मिलिमीटर पावसाची नोंद

औरंगाबाद: महिलेची छेडछाड काढल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ग्रामविकास अधिकाऱ्याकडून खंडणी उकळणाऱ्या तीन आरोपींपैकी एकाला अटक; पोलीस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत (२९ जून) वाढ

मुंबईः अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात एफआयआर दाखल; बलात्काराचा आरोप, कंगना रनौतच्या विधानानंतर तक्रार नोंद

जम्मू काश्मीरः शोपियां जिल्ह्यात दरीत बस कोसळून झालेल्या अपघातात ११ जण ठार; ६ जखमी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निकालाचे केले स्वागत

मुंबई: यंदाच्या मेडिकल प्रवाशांचे काय? जी प्रक्रिया सध्या सुरू आहे, त्यात अंमलबजावणी कशी करायची याबद्दल खंडपीठासमोर चर्चा सुरू

पुणे: मुसळधार पावसाने जंगली महाराज रास्ता गेला पाण्याखाली

मुंबईः न्यूयॉर्क एअर इंडिया विमानात बॉम्ब असल्याचा संशय; विमानाचे लंडनजवळील स्टँस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, ब्रिटिश लढाऊ विमानांचा घेरा

मध्य प्रदेशः आकाश विजयवर्गीय यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

कोल्हापूर: मराठा समाज आरक्षण निर्णय हायकोर्टात वैध ठरल्याबद्दल सकल मराठा समाजाकडून राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन; राज्य सरकारचे मानले आभार

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर क्रांतिचौकात पेढे वाटून जल्लोष
मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सरकारच्या बाजूने निर्णय येणार, हे आधीच कसे माहीत होते. त्यामुळे हायकोर्टाचा निर्णय निष्पक्ष नाही; सदावर्ते यांचा आरोप

न्यायालयाच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार , न्यायिक नीतिमूल्यांची पायमल्ली करणारा निकाल : विरोधी वकील गणेश सदावर्ते यांची प्रतिक्रिया

मुस्लिम आरक्षणावरून सपा आमदार अबू असीम आझमी यांचा सभागृहात हंगामा.

मुंबईः उच्च न्यायालयाच्या निकालावेळी न्यायालय आवारात मोठी गर्दी; पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात

मुख्यमंत्र्यांनी दिली सभागृहात अधिकृत माहिती.

१. शासनाला कायदा करण्याचा अधिकार आहे.
२. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि डेटा मान्य केला आहे. अपवादात्मक आणि विशेष स्थितीत आरक्षण देण्याचा शासनाला अधिकार.

४. शिक्षणात १२ टक्के आणि नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षणाला मान्यता.

५. निकालावर स्थगिती देण्यास उच्चन्यायालयाचा नकार.

सभागृहाचे मानले आभार. राज्य मागासवर्ग आयोगाचेही आभार.
मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्त्यांचे शांततेत आंदोलन केल्याबद्दल मानले आभार.महत्वाची लढाई आपण जिंकलो.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण.
सभागृहात न्यायालयाच्या निकालाचे स्वागत.

निकाल वाचनास सुरुवात

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार, उच्च न्यायालयाची माहिती. मराठा आरक्षण कायदा ठरला वैध; मात्र आरक्षणाची टक्केवारी राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या शिफारशीप्रमाणे १२-१३ टक्के ठेवावी लागणार
मुंबई: राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा वैध आहे की नाही याचा निकाल थोड्याच वेळात….मुंबई हायकोर्टाचे न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांचे खंडपीठ निर्णय देणार

मुंबई हायकोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी

मराठा आरक्षण कायद्याविरोधात जनहित याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील आणि त्यांचे वकील गुणरतन सदावर्ते पोलीस बंदोबस्तात हायकोर्टात

पुणे शहरातील बहुतांश भागात वीजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी

अहमदनगर: वर्धा जिल्ह्यात मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्यावी या मागणीसाठी नगर-औरंगाबाद रोडवर नेवासा फाटा येथे भारतीय लहूजी सेनेच्या वतीने रास्ता रोको

भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आणि भाजप आमदार आकाश यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पालिका अधिकारी मारहाण प्रकरण अंगलट

विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज अशी लढत

विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज अशी लढत होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. विंडीजविरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

विंडीजविरुद्ध नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

भारताचा संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, विजय शंकर, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जाडेजा, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत

वेस्ट इंडीज संघ: जेसन होल्डर (कर्णधार), क्रिस गेल, शाई होप, शिमरॉन हेटमेयर, कार्लोस ब्रॅथवेट, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस, केमार रोच, एश्ले नर्स, निकोलस पूरन, सुनील अंबरीश, एविन लुईस, शेनन गॅब्रिएल, डेरेन ब्रावो आणि फाबियान एलेन

आपलं सरकार

Click to listen highlighted text!