Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे : ब्रायन लारा , कोणताही धोका नसल्याची स्पष्टोक्ती

Spread the love

वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लारा याला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले. लाराच्या छातीत दुखत असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी ब्रायन लाराची अँजिओग्राफी केली. या चाचणीमधून लाराच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर करणे स्वतः आपण ठणठणीत असल्याचे सांगितले आहे.

“माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. माझ्या प्रकृतीत झटपट सुधारणा होत असून मी उद्याच डिस्चार्ज घेऊन माझ्या हॉटेलवरील रूममध्ये शिफ्ट होत आहे. माझ्या प्रकृतीत अचानक काय बिघडले अशी काळजी सगळ्यांनाच होती. कदाचित मी जिममध्ये जास्तीचा व्यायाम केला. त्यामुळे माझ्या छातीत दुखू लागले. डॉक्टर कडे जाणे हे मला इष्ट वाटले म्हणून मी रुग्णायल्यात दाखल झालो होतो. गरजेच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि मी सध्या झकासपैकी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना टीव्हीवर पाहत आहे”, असे ब्रायन लाराने सांगितले. विंडीज क्रिकेट मंडळाने याबाबतचे ट्विट केले आहे. लाराची अँजिओग्राफी करण्यात आली. त्यात त्याला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता अँजिओप्लास्टीची गरज नाही. विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने ब्रायन लारा मुंबईत आला आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!