Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रतीक्षा संपली , २५ जूनपासून मुंबईत तर शनिवारपासून राज्यात पावसाची सर्वत्र हजेरी , पुणे वेध शाळेचा अंदाज

Spread the love

आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. पण हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. दरम्यान, गुरुवारी अखेर मान्सून तळ कोकणात दाखल झाला. तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सूनला सुरूवात झाली. मान्सूनने आगमनाच्या दुसऱ्याच दिवशी काहिशी विश्रांती घेतली असली शनिवारपासून मात्र, मान्सूनची वाटचाल नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचा खुलासा पुणे वेधशाळेकडून करण्यात आला आहे.

२५ तारखेनंतर मात्र, मान्सून पुन्हा काहिशी उघडीप घेऊ शकतो. कारण, अरबी समुद्रात अजूनही मान्सूनसाठी म्हणावे तेवढे पोषक वातावरण तयार होऊ शकलेले नाही. या उलट पश्चिम बंगालच्या उपसागरावरचं कमी दाबाचं क्षेत्रं अजूनही अक्टिव्ह आहे असं पुणे वेधशाळेचं म्हणणं आहे. पण असं असलं तरी मुंबईत २५तारखेला तुफान पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.

२५ तारखेला मुंबईमध्ये भांगाची भरती असणार आहे. या भरतीचा मुंबईकरांना धोका असतो. कारण उधाणाची भरती जितकी मोठी असते तितक्याच लवकर ओहोटी पण होते. परंतू भांगाची भरती ११ तासानंतरही पाणी ओसारण्याचं नाव घेत नाही. म्हणजे मुंबईत अशा भांगाच्या भरतीवेळी मुसळधार पाऊस पडतो तेव्हा पाणी शहरातच साचून राहतं.

दरम्यान, राज्यात मान्सूनला वातावरण अनुकूल असून येत्या २ ते ३ दिवसामध्ये मान्सून राज्याच्या इतर भागातही सक्रीय होणार आहे. १३ ते १४ जून दरम्यान राज्यात मान्सूनचं आगमन होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. पण, वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनचं आगमन लांबलं. अखेर तळ कोकणात मान्सूनचं आगमन झालं आहे. येत्या ४८ तासामध्ये मान्सून उर्वरित राज्यात देखील दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात भीषण पाणी टंचाई

राज्याला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणांनी तळ गाठला असून नदी- नालेदेखील कोरडे ठाक पडले आहेत. मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरं चारा छावण्यांमध्ये बांधण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे हे मान्सूनच्या आगमनाकडे लागून राहिले आहेत.

दरम्यान,७ जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून १४ ते १५ जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता होती. पण, वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या स्थितीवर परिणाम झाला. त्यामुळे उशिरानं मान्सून राज्यात दाखल झाला आहे. तर राज्याच्या काही ठिकाणी चक्रीवादळामुळे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अवकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिक उद्ध्वस्त झाली तर काही ठिकाणी घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली तर काहींचा यात मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!