Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Modi sarkar 2 : अर्थसंकल्पाच्या आधी नरेंद्र मोदी यांची उद्या अर्थ र्थतज्ज्ञांसोबत बैठक

Spread the love

येत्या ५ जुलैला मोदी सरकारचं पूर्ण बजेट सादर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी उद्या ( २२जून) अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक घेणार आहेत. या बैठकीत अर्थव्यवस्था, शेती आणि निर्यात यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणार आहे. सोबत आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना बनवली जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार उद्याच्या बैठकीत ५ मुद्यांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीत अर्थव्यवस्था वेगवान करण्यावर विचार होऊ शकतो. शेतीचा विकास दर वाढवण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा होईल. निर्यात कसा वाढवायचा, हेही ठरवलं जाईल. त्याचबरोबर चांगली आरोग्य व्यवस्था हा मुद्दा फोकसमध्ये राहील. शिक्षण व्यवस्था आणि नवी शिक्षण नीती यावरव चर्चा होईल. या सगळ्या गोष्टींवर अर्थतज्ज्ञांनी सुचवलेल्या गोष्टींचा समावेश बजेटमध्ये केला जाईल. ब्लूमबर्ग या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार यावेळी नोकरदारांसाठी इन्कम टॅक्समध्ये मोठी सवलत मिळू शकते. इन्कम टॅक्स सूट २.५ लाखावरून ३ लाख रुपये होऊ शकते. एजन्सीच्या म्हणण्याप्रमाणे या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. फेब्रुवारीत जे अंतरिम बजेट सादर झालं त्यात ५ लाख रुपये मिळकत करमुक्त ठरवली होती.

अंतरिम बजेटमध्ये ५ लाखापर्यंत इन्कमवर पूर्ण रिबेट देऊन सरकारनं करदात्यांना मोठा दिलासा दिला होता. ब्लूमबर्ग अनुसार सरकार हा फायदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून सर्व करदात्यांना देऊ शकतं. अशी आशा आहे की सरकार ३ लाख रुपयापर्यंत टॅक्सेबल इन्कमची मर्यादा वाढू शकते. १० लाखावर ३० टक्के टॅक्स स्लॅब २०१२च्या बजेटपासून बदललं नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!