It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

…यांना आपण ओळखता का ? बघा बरं …

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

अमिताभ यांचा हा नवा लूक बघून सर्वांनाच त्यांच्या या नव्या भूमिकेची उत्सुकता असणार हे उघड आहे . अमिताभ नेहमीच नव्या आणि आगळ्या वेगळ्या आव्हानात्मक भूमिका स्वीकारतात.विशेष म्हणजे वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी ते  उत्साहात चित्रपटात काम करतात. नाविन्यपूर्ण भूमिकेमुळे बिग बींच्या नव्या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. आगामी चित्रपटातील लूकमुळे अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या अमिताभ बच्चन लखनऊ येथे आगामी चित्रपट ‘गुलाबो सिताबो’चे चित्रिकरण सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार करत आहेत. चित्रीकरण सुरू होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत चित्रिकरणाआधी मी असा आत गेलो होतो, मात्र, चित्रिकरणासाठी तयार झालो तेव्हा असा झाला. नेमक काय झाले हे सांगणार नाही.’ असे चाहत्यांना सांगितले.

मात्र, बिग बींच्या या ट्विटमधील रहस्य फार काळ टिकले नाही. त्यांचा या चित्रपटातील लूक समोर आला. हा लूक सोशल मीडियावर वायरल होत आहे. या लूकमध्ये अमिताभ मोठी दाढी आणि चष्म्यासह एकदम वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. अमिताभ यांच्या या हटके लूकमुळे त्यांच्या भूमिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Advertisements


Advertisements

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह आयुष्यमान खुराणादेखील असणार आहे. अमिताभ हे घरमालकाच्या भूमिकेत दिसणार असून आयुष्यमान खुराणा त्यांचा भाडेकरू असणार आहे. अमिताभ आणि दिग्दर्शक शुजित सरकार यांनी यापूर्वी ‘पिकू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.