Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आम्हाला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस ने आधी आमच्या स्टेटस बद्दल सांगावे आणि मगच चर्चा करावी : प्रकाश आंबेडकर

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम आहे असे म्हटले होते याबद्दल एकतर त्यांनी आम्हाला पुरावे द्यावेत अन्यथा ४० लाख मतदारांची माफी मागावी असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मिळालेली मतं काही ठिकाणी जास्त होती तर काही ठिकाणी कमी होती. जवळपास ४० लाखांहून अधिक मतदान वंचितला झालं. वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडले असा आरोप आमच्यावर केला जात आहे , त्याचे उत्तर आधी दिले पाहिजे . २८८ मतदार संघात आमची लढण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले.

ईव्हीएम च्या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाची भेटीसाठी वेळ मागितली आहे . मतदानात तफावतीचे उत्तर आम्हाला द्यात मिळाले नाही , त्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाविरुद्ध काय आंदोलन करायचे हे ठरवणार आहोत. दरम्यान आम्ही या बाबत न्यायालयातही जाणार आहोत असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.  युतीबाबत अद्याप आमची कोणाशीही बोलणी झालेली नाही.

आगामी विधान परिषदेची आमच्या पक्षाची  तयारी केली असून साधारणतः २० जुलै पर्यंत पहिल्या टप्प्यातील आमची यादी तयार करण्याचे आमचे ठरले आहे . या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसचं पानिपत झालं म्हणून आमच्याबरोबर बसायला तयार आहात का? काँग्रेसचे नेते केंद्रीय पातळीवरील आणि राज्यातील अशांनी वंचित बहुजन आघाडीवर आरोप केला की आम्ही भाजपाची बी टीम आहोत, तुम्ही आमचं स्टेटस काय धरता ? असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला तसेच पुरावे नसतील तर ४० लाख मतदारांची माफी मागावी अशी मागणी केली.

दरम्यान विधानसभा निवडणुकीबाबत वंचित बहुजन आघाडी पक्षाची बैठक झाली आहे. या बैठकीत पक्षाची रणनीती काय असावी याची चर्चा झाली. त्याचसोबत पक्षाचा विस्तार वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये शंकरराव लिंगे, धनराज वंजारी, अ‍ॅड विजय मोरे असे तीन उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. तर सांगली लोकसभा मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मते घेतलेले गोपीचंद पडळकर यांची पक्षाच्या प्रमुख सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजाराम पाटील, सचिन माळी, अनिल जाधव, नवनाथ पडळकर यासोबत इतर ६ जण सरचिटणीस असतील.  तसेच ईव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या संशयाबाबत २५ तारखेला निवडणूक आयोगाची वेळ मागितली आहे. ईव्हीएमच्या बाबत आम्ही दिल्लीत आंदोलन करणार आहोत असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला ईव्हीएमवरच मतदान घेण्यात रस असेल तर आपण निवडणूक प्रक्रियेत सहभागीच होऊ नये, अशी भूमिका विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हवी अशी मागणी केली होती.

वंचित बहुजन आघाडीचे पदाधीकारी

अध्यक्ष : प्रकाश आंबेडकर

उपाध्यक्ष : शंकर लिंगे , ऍड . विजय मोरे , धनराज वंजारी ,

महा सचिव : गोपीचंद पडळकर , राजाराम पाटील , डॉ . सावंत , सचिन माळी , डॉ . ए . आर . अंजारिया , कुशल मेश्राम , किसन चव्हाण , अनिल जाधव , नवनाथ पाडळकर , शिवानंद हैबतपुरे , मोहन राठोड, यशपाल भिंगे ,

संसदीय मंडळ : लक्ष्मण माने , अशोक सोनोने , अण्णाराव पाटील ,

महिला आघाडी प्रमुख : रेखा ठाकूर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!