Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केवळ कुणी जिहाद म्हटले तर त्याला दहशतवादी ठरवणे धाडसाचे , जिहादचा अर्थ संघर्ष : न्यायालय

Spread the love

केवळ ‘जिहाद’ शब्दाचा वापर केल्यामुळे कुठल्याही व्यक्तीला दहशतवादी म्हटलं जाऊ शकत नाही, असं अकोल्यातील न्यायालयाने म्हटलं आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी केली.

अकोल्यातील पुसद भागात २५ सप्टेंबर २०१५ रोजी बकरी ईदच्या दिवशी एका मशिदीबाहेर पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून अब्दुल रझाक (२४), शोएब खान (२४) आणि सलीम मलीक (२६) यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले. आरोपांनुसार, रझाक मशीदीत आला, त्याने चाकू काढला आणि ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांवर वार केला. हा हल्ला करण्यापूर्वी त्याने बीफबंदीमुळे पोलिसांना मारून टाकीन अशी कथित धमकी त्याने दिली.

दहशतवादविरोधी पथकाने दावा केला ही हे तिघे मुस्लिम युवकांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील करण्यासाठी प्रेरित करायचे. विशेष न्यायाधीश ए. एस. जाधव म्हणाले, ‘असं दिसतंय की आरोपी रझाकने गोहत्या बंदीमुळे होणाऱ्या हिंसेमुळे सरकार आणि काही हिंदू संघटनांवरचा राग काढला. त्याने जिहाद शब्दाचाही वापर केला. पण यावरून थेट  त्याला दहशतवादी ठरवणं धाडसाचं ठरेल.’

‘जिहाद’ अरबी भाषेतला शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे संघर्ष करणे. त्यामुळे केवळ जिहाद शब्दाचा वापर केला म्हणून त्या व्यक्तीला दहशतवादी ठरवणं योग्य नाही, असं सांगतच न्या. जाधव यांनी पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवत रझाक याला तीन वर्षं कोठडी सुनावली. मात्र तो २५ सप्टेंबर २०१५ पासून तुरुंगात असल्याने न्यायालयाने त्याची मुक्तता केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!