Jalgaon : प्रेमाला दाद देत नाही म्हणून शिक्षकाने विवाहित शिक्षेकेवर केला चाकू हल्ला !!

Advertisements
Advertisements
Spread the love

जळगाव जिल्ह्याच्या बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील आयटीआयमधील शिक्षकाने तेथीलच शिक्षिकेवर चाकुहल्ला केला. त्यानतंर त्याने स्वत:वर देखील चाकूने वार केले. दोघांना उपचारासाठी जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा चाकू हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षिकेच्या पतीनी दिलेल्या माहितीनुसार, चंदा उमेश गरकळ या बोदवड येथील आयटीआयमध्ये दीड वर्षांपासून नोकरीला आहेत. याच महाविद्यालयात कपूरचंद एकनाथ पाटील हा शिक्षकदेखील कामाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो चंदा गरकळ यांना व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर अश्लील मॅसेज पाठवत होता. मात्र, त्यांनी या मॅसेजला कुठलाही प्रतिसाद न देता महाविद्यालयाच्या वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार दिली होती. तथापि, आयटीआयचे संचालक मंडळ आणि प्राचार्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

Advertisements

बुधवारी सकाळी चंदा गरकळ यांना एकटे पाहून कपूरचंद पाटील यांनी एका वर्गाचा दरवाजा बंद करत त्यांनी धारदार शस्त्राने पोटावर तोंडावर हातावर वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार आयटीआयमहाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बोदवड येथील रुग्णालयात गरकळ यांना दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. यानंतर पाटील याने स्वत:वर वार केल्याने तोदेखील जखमी झाला आहे. त्यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार