Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संसदेत असदुद्दीन ओवैसी यांचे ” जय श्रीराम” च्या घोषणांना ” एक लोहार कि ” स्टाईल उत्तर !! बघा आणि पहा काय घोषणा दिल्या ?

Spread the love

 

https://www.youtube.com/channel/UCo0MRA_vxo8ZeL23gMBjifg

१७ व्य लोकसभेत जसे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे तसे भाजप सदस्य संसदेत ” जय श्रीराम ” चा नारा जोशात देत आहेत त्याचा प्रत्यय खासदारांच्या शपथ विधीच्या वेळी येत होता. सोमवारी संसद सत्राच्या दरम्यान भाजप सदस्यांनी ” जय श्रीराम ” आणि जय हिंद , वंदे मातरम च्या घोषणांनी दणाणून टाकली होती , हे सहन न झाल्याने कालच खा. नवनीत कौर राणा यांनी मी सर्व देवांना मानते परंतु संसदेत जय श्रीराम च्या घोषणा देणे उचित नाही असे म्हटले होते तरीही घोषणा थांबत नव्हत्या.

आज मंगळवारी मात्र एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेचा नूरच पालटून टाकला. त्याचे असे झाले कि , असदुद्दीन ओवैसी शपथ घेण्यासाठी ध्वनीक्षेपकाकडे जात असताना भाजप सदस्यांनी ” जय श्रीराम ” आणि ” वंदे मातरम ” च्या घोषणा देण्यास प्रारंभ केला त्यावर असदुद्दीन ओवैसी यांनी हातवारे करत आणखी जोरात असा इशारा केला तेंव्हा घोषणांचा आवाज आणखीच वाढल्या . या आवाजातच असदुद्दीन ओवैसी यांनी आपली शपथ उर्दूत घेतली आणि शेवटी “एक लोहारकी ” थाटात शपथेचा समारोप केल्या नंतर आपल्या घोषणांनी समारोप केला यात त्यांनी ” जय भीम ” ” जय मीम ” ” तकबीर”  ” अल्ला हो अकबर ” आणि ” जय हिंद ” अशा घोषणा देऊन ” जय श्रीराम ” म्हणणारांना सडेतोड उत्तर दिले . या विषयावर बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले कि , चांगले  आहे , मला बघून त्यांना या घोषणा आठवल्या खरे तर त्यांना बिहार मधील मुलांच्या मृत्यूचीही आठवण यावी आणि संविधानाचीही आठवण यावी.

दरम्यान त्यांचे हे चित्रीकरण हाती लागताच प्रसार माध्यमांनी प्राईम टाईम बातम्यात याचा खास उल्लेख केला त्यापैकी फक्त एनडीटीव्ही इंडिया  आणि अन्य काही माध्यमांनीच जे झाले ते दाखवले तर मोदी समर्थक माध्यमांनी संसदेतील ” जय श्रीराम ” च्या नाऱ्यांचा उल्लेख न करता फक्त ” वंदे मातरम ” आणि ” भारत माता कि जय ” याच घोषणांचा उल्लेख करून नेहमी प्रमाणे असदुद्दीन ओवैसी यांना या घोषणा चालत नाहीत असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!